कळमना येथे आझादी का अमृत महोत्सवाचे आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– कळमना येथे राजुरा तालुका विधी समिती, पंचायत समिती व ग्रामपंचायत कळमना यांच्या संयुक्त विद्यमानाने 75 व्या आजादी अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कळमनाचे सरपंच तथा काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई हे होते तर प्रमुख अतिथी पंचायत समिती विस्तार अधिकारी चुन्ने साहेब, उपसरपंच कौशल्या ताई कावळे, महादेवराव ताजणे तंटामुक्ती अध्यक्ष कळमना, रंजना दिवाकर पिंगे ग्रामपंचायत सदस्य, सुनिता उमाटे, साईनाथ पिंपळशेंडे, विठ्ठल राव वाढई, मुख्याध्यापक धान कुटे सर, पेंदोर सर, कार्यक्रमाचे व्यवस्थापक ग्रामसेवक नारनवरे, शिपाई विठ्ठल नागोसे, सुनील मेश्राम, अंगणवाडी सेविका शिरसागर, आशा वर्कर कल्पना शिरसागर, विविध बचत गटाच्या महिला व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी आझादी का 75व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कळमना गाव स्वच्छ सुंदर व हिरवेगार व्यसनमुक्त करण्याचा संकल्प गावचा सरपंच म्हणून नंदकिशोर वाढई यांनी भाषणादरम्यान केला व या संकल्पास सर्व गावकऱ्यांनी व उपस्थित मंडळीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *