लोकदर्शन 👉अशोककुमार भगत
गडचांदूर : केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीच्या निषेधार्थ कोरपना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरपना बसस्थानक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार पल्लवी आखरे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
तालुका काँग्रेस अध्यक्ष उत्तम पेचे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तसेच कामगार वर्ग आर्थिक संकटात सापडला असून केंद्र सरकारने तातडीने दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावणे, गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष संजय मेंढी, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम रणदिवे, सचिन भोयर, भाऊजी चव्हाण, सुरेश मालेकर, गणेश गोडे, शैलेश लोखंडे, नगरपरिषद सभापती तुषार बावणे, न. प. गटनेत्या प्रणिता उपाध्ये, नगरसेविका मनिषा परचाके, रोशन आस्वले, मिलिंद ताकसांडे, आशिष मोहुर्ले, वहाब भाई, रसूल पटेल, अनिल गोंडे, सरपंच रोशन मरापे, सुधाकर नांदेकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





