ऐतिहासिक बुद्धभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा

. लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे १५ ऑक्टोबर २०२१ रोज शुक्रवारला अशोक विजय दशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने भोजनदान, खिरदान, मार्गदर्शनपर भाषणे आणि सत्कार समारंभात फार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आद. भंते कश्यप यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर भंतेजी समवेत सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तद्नंतर गडचांदूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सविताताई टेकाम यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमांत भंते कश्यप, ठाणेदार आमले साहेब, नगरसेवक तथा गटनेते विक्रम येरणे, नगरसेवक तथा आरोग्य सभापती राहुलभाऊ उमरे, नगरसेवक अरविंद मेश्राम, नगरसेविका अश्विनीताई कांबळे, सुरेश टेकाम सर, जि.एस. कांबळे सर, मारोती लोखंडे सर, प्रा. रामराव पुणेकर, गौतम भसारकर, ईश्वर पडवेकर इत्यादीं उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपले समयोचित विचार मांडले.
सदर कार्यक्रमांत ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर येथे जाण्यासाठी नाल्यावर पुल आणि रोड नसल्याने बुद्धभूमी येथे जाणे-येणे करण्यास फार मोठा अडथळा असल्याने उपासिका, उपासक तथा पर्यटकांची वर्दळ रोडावली होती. ही समस्या लक्षात घेऊन गडचांदूर नगराध्यक्षा तसेच पदाधिकार्यांनी या भागातील लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या माध्यमातून नाल्यावर पुल व रोड बांधकाम करून दिले आणि महत्वाची समस्या दूर करण्यात आली. तसेच आमदार साहेबांनी बुद्धभूमी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी या भागाच्या सौंदर्यकरणासाठी १ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला.
बुद्धभूमीच्या विकासात विशेष योगदान दिल्याबद्दल गडचांदूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सविताताई सुरेश टेकाम व गडचांदूर नगरपरिषदेचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती राहुलभाऊ उमरे यांचे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोज शनीवारला घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बुद्धभूमी वंदना संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा धर्मग्रंथ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात भीमकन्या डान्स ग्रूप, गडचांदूरने बुद्ध- भीम गितावर वन्समोअर डान्स सादरीकरण केले आणि उपस्थितीतांची शाबासकी मिळविली.

मार्गदर्शनपर भाषणानंतर बुद्धभूमीस आलेल्या या परिसरातील नागरिकांनी भोजनदान आणि खिरदानाचा आस्वाद घेतला. दररोज सकाळी वंदनेला उपस्थित राहणारे उपासिका उपासक गोसावी चांदेकर, रमेश पाटील सर, वागदे सर, मच्छिंद्र वाघमारे, राजकुमार दुर्गे, रामदास बुचूंडे, बंडू पिपरे, तोडासे पेंटर, सुरेश धोंगडे, जयदेव मूनेश्वर, चिंतामणी घुले, अंकुर मुनेश्वर, अशोककुमार उमरे, शिवाजी धुपे, सटकू निषाद, दशरथ नरवाडे, देवराव भगत, अरुण मालखेडे, प्रभाकर खाडे, शंकर भगत, शिलाताई निरंजने, आशिल निरंजने, रविंद्र वाकडे, भानुदास पाटील, मिनाबाई मून, नंदा नारायण उमरे, निर्मला मून, पोर्णिमा उमरे, सुभाष वाघमारे, भीमराव भगत, अशोक गजभिये, घोरपडे, इत्यादींनी योगदान दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोसावी चांदेकर, संचालन अशोककुमार उमरे आणि आभार प्रदर्शन वागदे सरानी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *