NCB चे पश्चिम विभागीय संचालक समिर वानखेडे साहेबांची काही महिन्यांपूर्वीच घेतलेली एक मुलाखत !

लोकदर्शन  👉 मोहन भारती

ही मुलाखत ऐकल्यानंतर अंगावर काटा आला कारण त्यांच्या विभागाचे काम हे एवढे जोखमीचे आहे की त्याची तुलना सीमेवरील आपल्या जवानाबरोबर करता येईल. त्यांना प्रश्न विचारला की एवढ्या जोखमीची काम तुम्ही करता मग तुम्हाला जीवाला धोका होईल असे प्रसंग येतात का.
तर यावर त्यांनी सांगितल की असा एकही दिवस गेला नसेल की धमक्या येत नाहीत. नव्हे बारीकसारीक हल्ले झालेही आहेत. हे काम जे मी करतोय ती देशसेवाच आहे. नारकोटीक्स मधे पकडलेला माल असो, पकडलेल्या टोळ्या असो प्रत्येकवेळेस आम्ही आपल्या एका पिढीला वाचवतोय याची भावना मनात निर्माण होत असते. आमचे काम केवळ खबर काढून अमली पदार्थ पकडणे, गुन्हेगार पकडणे एवढ्यावरच मर्यादीत नसून सातत्याने युवापिढीचे प्रबोधन करत रहाणे हे सुध्दा आहे. आमची एक शाखा हे काम सातत्याने करत असते, याचे दुष्परिणाम समजाऊन सांगणे आणि पुन्हा त्या व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणणे हे काम खरोखरच जास्त आव्हानात्मक असते. लोकांच्या नजरेत आम्ही हिरो असतो, अगदी वॉरीयर असतो. जेव्हा कुठेही रेड नसते, फिल्डवर काम नसते तेव्हा आम्ही प्रबोधनाची कामे करतच असतो.
समिर सरांविषयी आणखी महत्वाची बातमी समजली ती म्हणजे ते NIA मधे पोस्टींगला असताना २०१६ मधे त्यांना केंद्रसरकार तर्फे अमेरीकेमधे स्नायपर ट्रेनिंग साठी एका टीमबरोबर पाठवण्यात आले होते. त्यामुळे समिर सर आज देशातिल उत्कृष्ट शार्पशूटर मधे गणले जातात. काही किलोमिटर अंतरावरून लक्षाचा अचूक वेध घेण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. NIA मधे असताना दहशतवादविरोधी अनेक मोहिमांमधे त्यांनी काम केले आहे.
गेले दोन दिवस एका विशिष्ट गटाकडून किंवा समुदायाकडून त्यांना टारगेट केले जात आहे. अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून सोशल मिडीयावर ही व्यक्ती नालायक असून शाहरूख खान सारख्या सेलिब्रेटी च्या तरूण मुलाला खोटेपणाने यात गोवल्याचे सांगण्याचा अटोकाट प्रयत्न चालू आहे.
NCB च्या कारवाईमधे संपूर्ण खातरजमा झाल्याशिवाय कधिही रेड टाकली जात नाही अन्यथा अशी कारवाई बुमरँग ठरू शकते याची जाणिव त्यांना आहे. त्यामुळेच या क्रूझवर धाड टाकताना NCB च्या टीमने देखिल या रेव्हपार्टी ची नियमित तिकीटे काढून एक सहभागी व्यक्ती म्हणुन प्रवेश मिळवला होता. आणि तिथेदेखिल पार्टी रंगात आली असताना आणि अमली पदार्थांचे वाटप व सेवन झाल्यावरच तपासणी, धरपकड चालू केली होती.
सोशल मिडीयावर तर एकाने अकलेचे तारे तोडले आहेत आणि आर्यन खान स्वतः अशी क्रूझ खरेदी करू शकतो तर तो अशा फुटकळ गोष्टींमधे कशाला पडेल अशी पण वार्ता केली आहे. काल शाहरूख खान च्या घरासमोर काही खानप्रेमींनी we back shahruh, we back aryan असे बॕनर पण झळकवले आहेत. देशात अशा प्रवृत्ती कार्यरत असताना समिर वानखेडे साहेबांसारख्या कर्तव्यकठोर व्यक्तीला पाठिंबा देणे हे आपल्यासारख्या देशप्रेमी जनतेचे काम असायला पाहिजे, नाही का ?
#वन्दे_मातरम्🙏🏼😌

#साभार

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *