मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण व एम. जी. एम. हॉस्पिटल वाशी (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि ९ एप्रिल मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण व एम. जी. एम. हॉस्पिटल वाशी (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर रविवार दिनांक १५-०५-२०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत उरण नगरपरिषद शाळा , पेन्शनस पार्क , एनएमएमटी बस स्टँड च्या समोर उरण शहर येथे आयोजित करण्यात आले आहे.

सदर आरोग्य शिबिरात जनरल तपासणी , दंत तपासणी,डोळे तपासणी ,रक्तदाब तपासणी,हाडांचे आजार तपासणी,मधुमेह रक्त तपासणी,स्त्रीरोग तपासणी , ई . सी. जी आदी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.तसेच ठराविक चष्म्यावर ५०% सवलत देण्यात येणार आहे.

गरजूंनी, रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा,सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण , MGM हॉस्पिटल वाशी नवी मुंबई,आर्ट ऑफ लिव्हिंग उरण,त्रिलोचन आय केअर क्लिनिक उरण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *