महात्मा गांधी स्कॉलर अकॅडमी येथे शाळा व्यवस्थापन समिती ची सभा संपन्न।                                         

लोकदर्शन 👉मोहन भारती

गडचांदूर
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी स्कॉलर्स अकॅडमी गडचांदूर येथे दिनांक 8/10/2021रोज शुक्रवार ला शाळा व्यवस्थापन समिती सभा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनंजय पाटील गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . यामध्ये वर्ग 5चे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा गांधी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री. धनराज मालेकार यांनी केले , कोविड 19 चा प्रादुर्भाव असताना विद्यार्थ्यांनी शाळेत येताना पाळण्यात येणारे नियम व अटी याबाबत मार्गदर्शन श्री .मोहन गव्हाणे यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दीपक खरवडे यांनी मार्गदर्शन करून प्रत्यक्ष वर्ग सुरू होत असल्याबद्दल स्वागत केले. महात्मा गांधी स्कॉलर अकॅडमी गडचांदूर ची मुख्याध्यापिका सौ.रश्मी भालेराव यांनी मार्गदर्शन केले. संचालन सौ. दरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन लीना बोढे यांनी केले.सभेला मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.कोविड चे सर्व नियम पाळून ही सभा पार पडली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *