

२५ बकऱ्या जागेवर मृत्यू तर एक महिला व मुलगा जखमी
पाटण/ जिवती-चंद्रपूर :– जिवती तालुक्यातील चिखली.बु येथे विज पडून बकऱ्या राखणारे सौ.कमलाबाई धर्मराव मेश्राम (महिला-४५) आणि नागेश रामशाव कोटनाके (मुलगा-२०) गंभीर जखमी यांना गडचांदूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. व २५ बकऱ्याचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पाटण, चिखली परिसरात आभाळ दाटून आले असता, 2.30 वाजताच्या दरम्यान, विजेचा कडकडाट सुरु झाला असून, पावसाला सुरुवात झाली. यावेळी बकऱ्या चरत होत्या अशातच जोरदार विज पडली आणि दुर्दैवाने २५ बकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये गावकऱ्यांचे कुणाचे ४ तर कुणाचे ५ अशा बकरे होते. एकूण २५ च्या वर बकऱ्या दगावल्या. ही घटना गावापासून एक किमी अंतरावर चराई साठी गेलेल्या जंगलात घडली. या दरम्यान, जोरदार पाऊस व विजेचा कडकडाट वीज पडून शेळ्या जागीच ठार झाल्यात.जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.