लखीमपूरखीरी शेतकरी हत्यांचा युवक काँग्रेसकडून निषेध.

लोकदर्शन 👉मोहन भारती


राजुरा :– उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूरखीरी येथे उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवून विरोध करण्यासाठी उभे असलेल्या शेतकऱ्यांना योगी सरकारातील मंत्र्याच्या मुलाच्या भरधाव गाडीने गाडीखाली चिरडून शेतकऱ्यांच्या हत्या घडवून आणल्या. या संदर्भात दोषींवर कडक कारवाई करून त्यांना फाशी देण्यात यावी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना मृतक शेतकरी कुटुंबीयांना भेटून सांत्वन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. पोलीस प्रशासनाकडून होत असलेली लोकशाहीची क्रूर चेष्टा थांबविण्यात यावी अशी मागणी करीत राजुरा विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने संविधान चौक राजुरा येथे सायंकाळी ७ वाजता शेतकरी हत्यांचा निषेध करण्यात आला.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सं. गां. नि. यो. अध्यक्ष साईनाथ बतकमावार, नगरसेवक हरजितसिंग संधू, आनंद दासरी, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेंडे, मतीन कुरेशी, संदीप आदे यासह अनेक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थीत होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *