भोयेगाव धानोरा वर्धा-पैनगंगा नदीच्या पुलावरील खड्डे बुजवा

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर


🔸अन्यथा आंदोलन असा इशारा श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष यांनी दिला आहे

कोरपना तालुक्यातील चंद्रपूरला जोडणारा वर्धा नदीवरील भोयगाव धानोरा पुलावरील खड्डे बुजवण्यात यावे आदिलाबाद, बेला,कोरपना,जिवती,गडचांदूर,राजुरा ते नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली,चंद्रपूर ला जोडणारा रस्ता असून या मार्गे सिमेंट कंपनीच्या चार सिमेंट फॅक्टरी आहे व या मार्गे अनेक वाहने 24 तास दिवस-रात्र सुरू राहतात या मार्गाने बस,ट्रक,कार, दुचाकी, बैलबंडी शेतकरी,शेतमजूर व इतर वाहने रोज रात्री-बेरात्री जात येत असतात या पुलावर मुख्य प्रवाहा असलेल्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या मुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे तरी भविष्यात होणारी जिवित हानी रोखण्यासाठी पी डब्लु डी तसेच लोकप्रतिनिधींनी व माहाराष्ट्र शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन हे खड्डे बुजवून होणारी जीवित हानी टाळावी यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास कोणतीही अडचण राहणार नाही करिता पुलावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांनी केली आहे तसेच श्री सतीश उपलंचीवार शहराध्यक्ष गडचांदूर,श्री नथु पाटील ढवस भाजपा महामंत्री,श्री मनोर कुरसंगे महामंत्री,श्री विशालजी गज्जलवार, श्री संजय भाऊ मुसळे, श्री पुरुषोत्तमजी निब्रड,श्री कवडु पाटील जरिले, श्री अरुण मडावी सरपंच,श्री पुरुषोत्तमजी भोंगळे उपाध्यक्ष,श्री किशोरजी बावणे, श्री अमोल असेकर, श्री अनिल कवरासे, श्री शशिकांत अडकिने, श्री विजय रणदिवे माझी सरपंच,श्री संजय चौधरी, श्री दिनेश खडसे,श्री दिपक भोस्कर,श्री भास्कर वडस्कर,श्री गजानन लांडे आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे आठ दिवसात रस्ता दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *