राजुरा काँग्रेस द्वारा महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचे आयोजन.

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त राजुरा तालुका काँग्रेस कमिटी द्वारा काँग्रेस कार्यालय, गांधी भवन राजुरा येथे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेसच्या विविध शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी नागरिकांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन केले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा कविता उपरे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, जि. प. सदस्या मेघा नलगे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, सं.गा.नि.यो. अध्यक्ष साईनाथ बतकमवार, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, सेवादल महिला अध्यक्षा अर्चना गर्गेलवार, प.स. उपसभापती मंगेश गुरणुले, महिला शहराध्यक्षा संध्या चांदेकर, प.स. सदस्य तुकाराम माणुसमरे, नगरसेवक गजानन भटारकर, नगरसेविका साधना भाके, वज्रमाला बतकमवार, दीपा करमरकर, शुभांगी खामनकर, सुमित्रा कुचकर, प्रणाली ताकसांडे, कामिनी उईके, सय्यद साबीर, शहनवाज कुरेशी, करीमभाई कुरेशी, कबीर बेग, लहू चहारे, कवडू सातपूते, धनराज चिंचोलकर, विकास देवाळकर, मतीन कुरेशी, संदीप आदे, गजेंद्र ढवस यासह काँग्रेसच्या विविध शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजुरा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष एजाज अहमद यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवर यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *