नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळु सकस आहाराचे वितरण.

By : mohan bharti

राजुरा :– राजुरा शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘बाळू’ (Be A Part Of Loving Unit) संस्थेच्या सामाजिक उपक्रमाला सहकार्य करीत नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या वतीने राजुरा शहरातील ११ गरोदर मातांना त्यांचे बाळ कुपोषित जन्मू नये या करिता बाळू सकस आहार किट चे वितरण आज दिनांक 30 सप्टेंबर २०२१ ला न. प. सभागृह राजुरा येथे करण्यात आले.
प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, प. स. सभापती मुमताज जावेद अब्दुल, बांधकाम सभापती हरजीत सिंग संधू, नगरसेवक गजानन भटारकर, जैपूलकर,उपसरपंच जावेद भाई, तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन बाळु संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा विस्तार अधिकारी अमित महाजनवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील गरोदर माता, अंगणवाडी सेविका, काँग्रेसचे विविध शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते न प कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर शहरात तसेच गडचांदूर आणि परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तर वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *