गरजू विद्यार्थ्यांकरिता सेवाभावी हात * कृतज्ञता परिवार सेवेचा आदर्श

By : Shankar Tadas, Nagpur
9850232854

कचऱ्यातून कला ही कल्पना आपण अनेकदा ऐकतो. हाच ‘कचरा’ देशाचे सर्वोच्च अधिकारी घडवू शकतो असे सांगितले तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. परंतु कर्तबगार माणसं कुठेही स्वर्ग तयार करतात. नागपूरला अशीच एक संस्था मागील 23 वर्षापासून प्रयत्नशील आहे. या संस्थेचे विविध उपक्रम आश्चर्यकारक यशस्वी झाले आहेत. गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे हा मुख्य उद्देश. त्याकरिता समाजातून सहकार्य मिळवून संस्था वाटचाल करीत आहे. अगदी प्रामाणिकपणे झटून समाजाकरिता सामान्य माणूसही बरेच काही करू शकतो याची साक्ष येथे भेट दिली की नक्कीच पटते आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणाही मिळते.
आजपर्यंत हजारो विद्यार्थी येथेच जगण्याचे बळ प्राप्त करून सक्षम झालेत. कित्येक अधिकारी, प्राध्यापक झालेत. सेवेचे हजारो अनामिक हात येथे एकवटले. सेवाभावी लोक घरची रद्दी आणि निरुपयोगी वस्तू संस्थेला नियमित
दान करतात. सर्वच स्तरारील व्यक्तीला येथे विविध माध्यमातून सहकार्य देता येते. थेंबे थेंबे तळे साचे हा येथील परिपाठ. रिसर्च अँड डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचा हा उपक्रम ‘कृतज्ञता’ परिवार ‘ नावाने सुरू आहे. नागपूर येथे विविध ठिकाणी काही वर्षे संस्था सुरू होती. आता MIDC परिसरात अगदी राष्ट्रीय मार्गालगद 2 एकर जागेवर सुसज्ज इमारत आहे. अभ्यासिका, कॅम्पुटर रूम, लायब्ररीसह 100 विद्यार्थी राहू शकतील एवढी व्यवस्था येथे आहे. अल्प मोबदला देऊन कोणत्याही शाखेचे आणि स्पर्धा परीक्षा देणारे गरजू विद्यार्थी येथे प्रवेश मिळवू शकतात.

सबकुछ ‘आई ‘
देवालाही पदवी द्यायची तर ‘आई’ म्हटले जाते. या शब्दाला सर्वार्थाने जगणाऱ्या येथेही एक ‘आई’ कारभार जपतात. निव्वळ सांभाळतात असे नव्हे. या सेवामंदिराची ती पवित्र मूर्ती. ही उत्साहमूर्ती केवळ 80 वर्षीय. कामठी येथील होमसायन्स कॉलेजच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका. त्या कोणताही मोबदला न घेता 34 तास सेवा देतात. त्यांच्याविषयी आणखी काय सांगावे येथील प्रत्येकाची ती शिस्तप्रिय आई आहे.
आणि संस्थेचे संचालक डॉ. दादाराव बनकर सर त्या आईचे लाडके मूल शोभावे असे व्यक्तीमत्व. बरीच मोठी नावे पडद्याआड राहून सेवा देतात. गाजावाजा करण्यात वेळ गमवायचा नाही, अशी संस्थेची धारणा. मोठी कार्यें समाज पारखूनच स्वीकारतो. हा अवघड टप्पा संस्था किंवा व्यक्तीला पार पाडावाच लागतो. नंतरचा प्रवास गोड फळे चाखण्याचा असतो. संस्थेला हे समाधान लाभलेले आहे. आता ध्येय एकच अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांनी येथील सेवेचा लाभ घ्यावा आणि जाणत्या लोकांनी हा सेवायज्ञ सतत प्रज्वलित ठेवावा.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *