उत्तर नागपूरमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे आभासी पद्धतीने भूमिपूजन संपन्न

२ कोटी ६८ लक्ष २३ हजार रुपये निधीतून साधणार विकास

नागपूर दिनांक १९ सप्टेंबर:
उत्तर नागपुरातील ब्लॉक क्रमांक १३ अंतर्गत प्रभाग क्रमांक १,२, व ९, येथे आज विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते आभासी पद्धतीने संपन्न झाले. एकूण २ कोटी ७८ लक्ष, २३ हजार रुपये इतका निधी या विकास कार्यांवर खर्च होणार असून यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत
बेझनबाग सभागृह ते गुरु नानक शाळा रस्त्याचे डांबरीकरण (निधी- ५ लक्ष) बेझनबाग सभागृहामागे श्री अशोक मेश्राम ते अशोक शेंडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण (निधी- ५ लक्ष), मौजा इंदोरा, विश्वासनगर येथील
समाजभवन प्रथम माळ्यावर बांधकाम ( निधी- १५.५९ लक्ष)
मौजा इंदोरा विश्वासनगर मेथे खुल्या
जागेवर बगीचा निर्मीती ( निधी- १०.५४ लक्ष) यांचा समावेश आहे.
दलित वस्ती विकास योजनेतून निर्मल कॉलोनी खसरा क्र. २००/१ प्रभाग क्रमांक १ येथील रस्त्याचे डांबरीकरण (निधी- २५ लक्ष)
के जी एन सोसायटी, सुवर्णनगर
येथे रस्ता निर्माण (निधी- २३.५० लक्ष), मौजा इंदोरा न्यू ठवरे कॉलोनी येथील बुद्ध विहाराजवळ बाग निर्मिती तसेच ग्रंथालय निर्मीती (निधी- २१.०९ लक्ष) आणि
शेंडे नगर येथे ग्रंथालय इमारतीचे बांधकाम (निधी- ३१.२२ लक्ष) या निधीतून या वस्त्यांचा विकास साधला जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत उत्तर नागपुरातील १६ वेगवेगळ्या ठीकाणी कार्यकर्त्यांच्या हस्ते कुदळ घालून हे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी आभासी पद्धतीने ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ नितीन राऊत उपस्थित होते. उत्तर नागपूर च्या जनतेचा विकास हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या माननीय पालकमंत्री महोदयांनी यावेळी आपल्या आभासी उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न करून कार्यकर्त्यांना सन्मान देऊन एक नवीन पायंडा पाडला हे विशेष.

आमदार नीधी अंतर्गत स्थानिक विकास कामे
मौजा जरीपटका येथील झुलेलाल पार्क येथे योगा सेन्टरचे बांधकाम
( निधी- १७.३१ लक्ष) मौजा नारा येथील माजी सैनिक सोसायटी येथे बगीचा निर्मीती (निधी- १२.८२ लक्ष)
मौजा नारा येथील साई सेवाश्रम गृह
निर्माण सोसायटी येथे बगीचा निर्मीती व स्टील खुर्च्या लावणे (निधी- १७.५६ लक्ष), मौजा नारा, तारकेश्वर नगर येथे रस्त्याचे बांधकाम (निधी- १३.०९ लक्ष) या निधीतून चौफेर विकास साध्य होणार आहे.
प्रभाग क्रमांक २, कामठी रोड येथील
साई मंदिराच्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम (निधी- १३.४० लक्ष),
उप्पलवाडी, दत्तात्रय नगर येथे समाज भवन निर्माण (निधी- १७.७१ लक्ष), प्रभाग क्र २ मौजा नारी समता नगर, शाह आटा चक्की ते विटा भट्टी चौक पर्यंतचे द्वितीय चरण खडीकरण ( निधी २२.२६ लक्ष)
इतका निधी या विकास कार्यावर खर्च केला जाणार आहे.
या भूमिपूजन समारंभ प्रसंगी
कृष्ण कुमार पांडे, रत्नाकर जयपुरकर, ठाकुर जग्यासी, बडूपत टेभुरने, सुरेश जग्याशी, सुरेश पाटील, दिपक खोबरागडे, विनोद राऊत, दिनेश यादव, नेहा राकेश निकोसे, सतीश पाली, विजया हजारे, गौतम अंबादे, मानिक वजारी, ममता सयाम, सुनंदा राऊत, संगीत टेभुरने, चदकाता सहाने, देवेन्द्र करवाडे, रेखा लाजेवार, सचिन वासनिक, सप्तर्षि लाजेवार, संदेश कोटागडे, हितेश उके, राकेश इखार, दिशाताई भिमगडे, चदाताई वासनिक, रवि कोटाल, भुषण पाली, सत्यजीत राय, साहेबराव सिरसाट, राम यादव, अनिरुद्ध गणवीर, घनश्याम यादव, ज्योती गोलाईत, अजमल अहमद, बैबी गोरीकर, सजय निकोसे, महेन्द्र बोरकर, गोपाल रजवाडे, शालीनी ढोटे, मगला रामटेके, आशोक वासनिक, रुपेश हजारे, वर्षा कोसरे, विजया शेडे, सोनु खोबरागडे, ज्योती खोबरागडे, रवि शेडे, प्रभाकर सोमकुवर, उतरेश वासनिक, जितु सहारे प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *