विदर्भ बुरुड समाज च्या अध्यक्ष पदी हरिषजी दिकोंडावार

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
नागपूर :_
दि. ५/६/२०२२ रोजी रविवारला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सभागृह, गुरूदेव नगर नंदनवन,रोड नागपूर येथे विदर्भ बुरुड समाजाची आमसभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मा. प्रभाकरराव पटकोटवार तत्कालीन अध्यक्ष विदर्भ बुरुड समाज, हे होते. प्रथम नागपूर जिल्हा बुरुड समाजाच्या वतीने मान. श्री. अरुणजी पद्मगिरवार यांनी मंचावरील सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांचे हस्ते श्री केतैय्या स्वामींच्या प्रतिमेला पुष्पहार टाकून दीप प्रज्वलन करुन सभेची सुरुवात करण्यांत आली. सर्वप्रथम मागिल सभेचे इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. त्यानंतर मागिल चार वर्षाचा कार्याचा अहवाल व जमाखर्च मान. श्री बंडुजी गयनेवार (महासचिव) यांनी सभेसमोर ठेवला व त्यास चर्चा करून मंजूर करण्यात आला त्यानंतर सन्माननीय अध्यक्षांनी विदर्भ बुरुड समाज कार्यकारीणीची निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक अधिकारी डॉ. श्री सुरेश पुट्टेवार, नागपूर व सहा. निवडणूक अधिकारी श्री शरदजी सत्रमवार, नागपूर यांना निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मंचावर आमंत्रित केले. दोन्ही निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रथम कार्यकारिणीतील तेरा पदाकरिता आलेल्या अर्जाची छाननी करुन सांगितले की, नऊ पदाकरिता फक्त एकच अर्ज आल्यामुळे त्यांची बिन विरोध निवड करण्यात आली, तर एका पदा करिता एकही अर्ज आला नव्हता, आणि ईतर तीन पदा करिता एका पेक्षा जास्त अर्ज आल्यामुळे तीन पदाकरिता निवडणूक घेण्याचे ठरले. त्याप्रमाने प्रथम अध्यक्ष पदाकरिता निवडणूक घेण्यात आली , त्यात श्री हरिषजी सितारामजी दिकोंडवार, नागपूर यांना १७२ मते मिळाली तर श्री विनायकराव पद्मगिरवार कारंजा लाड यांना ६९ मते मिळाली आणि श्री दिनकरजी पिल्लेवार, नागपूर यांना एकुन १५ मते मिळाली. त्यानंतर महासचिव पदाकरिता निवडणूक घेण्यात आली त्यात श्री. बंडुजी रामचंद्र गयनेवार, नागपूर यांना २२९ मते मिळाली तर श्री विनोद वसंतराव चिलविरवार, नागपूर यांना २९ मते मिळाली, त्यानंतर सचिव (महिला)ह्या पदाकरिता निवडणूक घेण्यात आली त्यात सौ. अनुराधाताई पल्लडवार, नागपूर यांना १६८ मते मिळाली तर सौ.मंजुषा पुट्टेवार, चंद्रपूर यांना ९३ मते मिळाली, त्यानंतर सर्व समाज बांधवांचे जेवण झाल्यांनतर मान. निवडणूक अधिकारी यांनी निकाल घोषीत करुन सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ति पत्रे देण्यात आली. नागपूर जिल्हा बुरुड समाज कार्यकारीणीच्या वतीने व चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी च्या वतीने नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रथम नवनियुक्त अध्यक्ष श्री हरिषजी दिकोंडवार यांचे स्वागत मावळते अध्यक्ष श्री. प्रभाकरराव पटकोटवार यांचे हस्ते शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान. श्री बंडुजी गयनेवार महासचिव यांचे स्वागत नागपूर जिल्हा अध्यक्ष अरुणजी पद्मगिरवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर श्री हरिषजी दिकोंडवार, व श्री बंडुजी गयनेवार यांनी आपले मनोगत व्यक्त करुन समाज बांधवांना येत्या काळात संघटने द्वारे करण्यात येणाऱ्या कामाचे स्वरूप काय राहील हे सांगितले व समाजाने हयाकरीता सहकार्य करावे अशी आग्रही विनंती केली. नवनिर्वाचित विदर्भ बुरुड समाजाची कार्यकारिणीची पुढील प्रमाणे निवड करण्यात आली… १) अध्यक्ष- श्री हरिषजी दिकोंडवार, नागपूर. २) उपाध्येक्ष- अमरावती विभाग श्री राजेश्वरजी पद्मगिरवार, यवतमाळ. ३) उपाध्यक्ष- नागपूर विभाग…….रिक्त …………. ४) महासचिव- श्री बंडुजी गयनेवार, नागपूर. ५) संघटन सचिव- नागपूर विभाग सौ. दिपांजलीताई प्रशांतजी मंथनवार गडचांदुर. ६)संघटन सचिव- अमरावती विभाग श्री. शशिकांतजी पेंढारकर, वाशीम. ७) सचिव- नागपूर विभाग श्री सुरेश गंगारामजी पुट्टेवार चंद्रपूर. ८)सचिव- अमरावती विभाग श्री संजयराव मांजरे ढाणकी जि. यवतमाळ ९) सचिव कार्यालयीन श्री. आकाश पेंढारवार, नागपूर. १०) सचिव- महिला सौ. अनुराधाताई पल्लडवार, नागपूर. ११) युवा सचिव- सौ. पायल स्वप्नीलजी कुंदेलवार, नागपूर. १२) कोषाध्यक्ष- श्री राजेश मारोतरावजी सुलभेवार, यवतमाळ. १३) अंकेक्षक- श्री हिमासनकिशोर दिवटे, हिंगणघाट. या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यामुळे समाजात ऊत्साहाचे वातावरण दिसुन आले. नागपूर जिल्ह्यातील सर्व बुरुड समाज बांधवांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री राजेश नंदुजी सुलभेवार यांनी आपल्या सुमधुर वाणीने करुन कार्यक्रम यशस्वी केला.*
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *