शेडवाहीच्या नुकसानग्रस्तांना आमदार सुभाष धोटे यांची आर्थिक मदत.

By Mohan Bharti

राजुरा  :– जिवती तालुक्यातील शेडवाही (भारी) येथे शॉर्ट सर्किमुळे घराला आग लागल्यामुळे दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी अंदाजे रात्री १ वाजता च्या सुमारास दत्तू पाटील सोमा वाढई यांचे राहते घर संपूर्ण जळाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सांत्वन करुन आमदार सुभाष धोटे यांनी वैयक्तिक मदत म्हणुन 10,000/- रूपये दिले आणि स्थानिक स्तरावर झालेल्या नुकसानीचे शासकीय यंत्रणेकडून सर्व आवश्यक मदत तातडीने मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वस्त केले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी सरपंच सिताराम मडावी, माजी सरपंच भीमराव पवार, दत्तु पाटील यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *