भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी

By : Shivaji Selokar

कन्हाळगाव येथे भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने दीनदयाल उपाध्याय यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे श्री प्रविण भोयर, श्री राजू लटारी येरेकर बुथ प्रमुख, श्री सुरेन्द्र पावडे,सौ मंदाताई हिवरकर, सुधाकर कव्वलवार,पींटु गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनावर प्रकाश टाकला भारतीय जनता पार्टी चे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांनी भारतीय जनता पार्टी साठी त्यांनी आपले जीवन पूर्ण अर्पण केले पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी झाला त्यांनी आपल्या 52 वर्षांच्या कार्यकाळात भारतीय जनता पार्टीची मनोभावे सेवा केली हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते जनसंघाच्या पायाभरणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते भारतीय संघातून पुढे भारतीय जनता पार्टी चा उगम झाला अज्ञात मारेकर्‍यांनी मुगलसराय रेल्वे स्टेशन जवळ यांची हत्या केली आज त्या रेल्वे चे नाव पंडित दीनदयाल उपाध्याय जगशंन असे ठेवण्यात आले पंडित दीनदयाल उपाध्याय भारतीय जनता पार्टीचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे असे मनोगत व्यक्त केले इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राजू येरेकर यांनी केले तर आभार सुधाकर कव्वलवार यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *