“उत्पन्न कमी,खर्च जास्त” घरगुती नळ कनेक्शन देणे न.प.ला लाभदायक.

लोकदर्शन  👉 शिवाजी सेलोकर

🔸(नगरसेवक अरविंद डोहे यांची नगराध्यक्षा कडे मागणी )

गडचांदूर:-
गडचांदूर नगरपरिषदेच्या सामान्य फंडाची परिस्थिती दयनीय असल्याने मागील ९ ते १० महिन्यांपासून सफाई कामगारांचे वेतन थकले आहे.पाणी पुरवठ्याचे विद्युत बिल भरणे कठीण होऊन बसले आहे.अशा परिस्थितीत शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेला बिल भरण्यासाठी वारंवार १४ वित्त आयोग फंडाचा वापर करावा लागत आहे.एकंदरीत पाणी पुरवठ्याची परिस्थिती म्हणजे “उत्पन्न कमी,खर्च जास्त” अशी बनली आहे.
अशातच नागरिकांकडून सतत घरगुती नळ कनेक्शनची मागणी होत आहे.परंतु सातत्याने न.प.चे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.जर सार्वजनिक नळ बंद करून घरगुती नळ दिल्यास नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते ! तरी न.प.चे हित लक्षात घेऊन आगामी सर्वसाधारण सभेत सदरचा विषय घ्यावा व घरगुती नळ जोडणी देण्याबाबतचा ठराव मंजूर करावा.अन्यथा न.प.च्या हितासाठी आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागले असा विनंतीपुर्वक इशारा न.प.तील विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांनी नगराध्यक्षाला निवेदनातून दिला आहे.
सदर विषयी सविस्तर असे की,वर्ष २०१२ मध्ये राज्य शासनाने गडचांदूर शहरासाठी जलशुद्धीकरण केंद्र मंजूर केले.सदर कामाची कार्यान्वय यंत्रणा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला देण्यात आली.त्यांनी काम पूर्ण केले व मागील दीड ते दोन वर्षापुर्वी नगरपरिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने संयुक्तपणे शहरात पाणी पुरवठा सुरू केला. त्यात कुठलेही काम अपुरे किंवा दर्जाहीन असल्यास ती योजना परत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपवून त्यांच्याकडून ते करून घेणे गरजेचे होते.परंतू असे न करता सदरची योजना न.प.ने स्वतःकडे घेतली व शहरातील काही भागात सरकारी नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला.त्या योजनेवर न.प.कडून विद्युत बिल,देखरेख व दुरूस्तीवर मोठा खर्चही करण्यात येत आहे.मात्र त्या योजनेचा पाणीपुरवठा सरकारी नळाद्वारे होत असल्याने न.प.ला त्यापासून काहिही उत्पन्न मिळत नाही.यामुळे न.प.ला मोठा आर्थिक फटका बसत आहे.
सदरची योजना न.प.ला हस्तांतरीत करून नागरिकांना घरगुती नळ द्यावे.यामुळे जनतेला मुबलक पाणीपुरवठा करता येईल आणि न.प.ला आर्थिक लाभही होईल.ही बाब नगरसेवक डोहे यांनी न.प.च्या निदर्शनास आणून दिले होते.सदरचा विषय अनेकदा सभेला घेण्यात आला परंतू त्या ? कारणामुळे जलशुद्धीकरण योजना हस्तांतरणचा ठराव न.प.कडून नामंजूर करण्यात आला.त्यानंतरही नगरसेवक डोहे यांनी सतत मागणी सुरू ठेवल्याने मागील ८ मार्च २०२१ च्या सर्वसाधारण सभेत हस्तांतरणाचा विषय ठेवण्यात आला.मात्र सदर योजनेची बरीचशी कामे अपुरी असल्याची जानकारी पाणी पुरवठा अभियंतांनी सभागृहात दिली.यावरून सभागृहात म.जि.प्रा.चे संबंधित अभियंता व न.प.अभियंतांनी फेर पडताळनी करावी तसेच नगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापतींद्वारे प्रत्यक्ष मौका चौकशी करून योजना हस्तांतरीत करणे बाबत पुढील सभेत विषय ठेवण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला.परंतू याला सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही फेर पडताळणी केली गेली नाही,असे कळते.त्यानंतर सभेला विषय सुद्धा घेण्यात आलेला नाही.मात्र आगामी सभेत घरगुती नळ कनेक्शन देण्याबाबतचा विषय घ्यावा,जेणेकरून न.प.च्या उत्पन्नात वाढ होईल.सदर मागणी नगरपरिषदेला आर्थिक लाभ देणारी असून याकडे सकारात्मक दृष्टीने पहावे अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला आंदोलनाचा हत्यार उपसावा लागेल आणि त्यापासून होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार राहाल असा इशारा विरोधी पक्ष नगरसेवक डोहे यांनी नगराध्यक्षाला निवेदनातून दिलाआहे.मा.जिल्हाधिकारी,मा.जिल्हा प्रशासन अधिकारी न.प.विभाग,मुख्याधिकारी न.प.गडचांदूर,पाणीपुरवठा सभापती न.प.गडचांदूर यांनाही सदर विषयी निवेदन देण्यात आले आहे.आता आगामी सर्वसाधारण सभेत याविषयी काय घडते ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *