सर्व एक्सप्रेस गाड्या लवकरच सुरू होणार

चंद्रपूर स्टेशन ते चांदा फोर्ट जोडण्याचे काम प्रगतीपथावर – हंसराज अहीर

चंद्रपूर:- चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील रेल्वे विषयक समस्यांबाबत पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दि. 23 सप्टेंबर रोजी मंडल रेल प्रबंधक कार्यालय नागपूर येथे बैठक पार पडली. या बैठकीत अनेक रेल्वे गाड्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. सदर बैठकीस मंडल रेल प्रबंधक ऋचा खरे, सिनीअर डिसीएम, सिनीअर डिओएम, झेडआरयुसीसी चे सदस्य दामोदर मंत्राी, चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीचे पुनम तिवारी, अनिश दिक्षीत, प्रमोद त्रिवेदी, गौतम यादव व रेल्वेचे अन्य अधिकारी उपस्थित होते. पॅसेंजर गाड्या सुरु करण्याकरीता मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा रेल्वे मंत्रालयाने सर्व पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचे निर्देश दिले आहे परंतू राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गाड्यांना अनुमती नाकारल्यामुळे त्या सुरू होण्यास व्यत्यय निर्माण झालेला असल्याने मान. मुख्यमंत्र्यांशी या विषयी चर्चा करून हा प्रश्न तातडीने सोडविला जाईल असे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बैठकीमध्ये सांगीतले.
बैठकीमध्ये पूणे, मुंबई, ताडोबा, आनंदवन, सेवाग्राम, नंदीग्राम व हैद्राबाद मार्गे येणाऱ्या गाड्यांबाबत तसेच हावडा करीता थेट गाडी याबरोबरच बल्लारशाह पिटलाईन चे काम व मुकूटबन हाल्ट स्टेशन आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची अनुमती असल्याने सर्व एक्सप्रेस पूर्ववत सुरू होत आहेत. तसेच चंद्रपूर स्टेशन चांदा फोर्टला जोडण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या लाईनचे काम त्वरेने सुरू आहे. बल्हारशाह पिटलाईन चे काम ऑकटोबर तर मुकुटबन हाॅल्ट स्टेशन डिसेंबर पर्यंत पूर्ण बल्लारशाह पिटलाईन चे काम 20 आॅक्टोंबर पर्यंत पूर्ण होणार आहे तसेच मुकूटबन हाल्ट स्टेशन चे काम डिसेंबर पर्यंत पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
रामगीरी पॅसेंजर चंद्रपूर पर्यंत धावणार, पूणे.काजिपेठ एक्सप्रेस सप्ताहात 3 दिवस चालण्यास मान्यता रामगिरी पॅसेंजरला चंद्रपूर पर्यंत एक्सटेंशन देण्यात आले आहे ती लवकरच सुरू होत आहे. पूणे गाडीला तीन दिवस चालविण्याची मान्यता मिळाली असल्याने ती हडपसर (पूणे) येथुन बल्लारशाह पर्यंत सुरू करावी. लिंक एक्सप्रेस गाड्या बंद केल्याने सेवाग्राम एक्सप्रेस बल्लारशाह पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यात अडचण असल्यास आनंदवन एक्सप्रेस दादर स्टेशनवरून बल्लारशाह करीता रोज सोडावी जेणेकरून प्रवाशांना सुविधाकारक होईल. भाग्यनगरी एक्सप्रेस कागजनगर पर्यंत सुरू आहे ती बल्लारशाह पर्यंत चालविण्यात यावी अशी मागणी हंसराज अहीर यांनी केली.
चंद्रपूर स्टेशनला पूनर्विकास योजनेअंतर्गत मान्यता चंद्रपूर रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणाकरीता पूनर्विकास योजनेअंतर्गत (Redevelopment Scheme ) मान्यता देण्यात आली असून बल्लारशाह रेल्वे स्टेशनचे काम दुसऱ्या टप्यात सुरू होणार आहे. तसेच बल्लारशाह स्टेशन वरील महिला/पुरूष अप्पर क्लास वेटींग रूम चे काम येत्या दोन महिण्यात पूर्ण होईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये हंसराज अहीर यांना दिली. यावेळी वणी रेल्वे प्लॅटफार्मची लांबी वाढविणे तसेच येथील कोल साइडींग हटवून ते कायर येथेे स्थानांतरीत करणे व सर्व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा वणी येथे देण्याची सूचना अहीर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *