महात्मा गांधी विद्यालयात प्रबोधनकार केशव ठाकरे यांची जयंती साजरी

By : Mohan Bharti

गडचांदूर : महात्मा गांधी विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती 17 सप्टेंबर ला साजरी करण्यात आली,याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ.स्मिताताई अनिलराव चिताडे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणू संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय पाटील गोरे,उपमुख्याध्यापिका शोभाताई घोडे,उपप्राचार्य विजय आकनुरवार,पर्यवेक्षक अनिल काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली . वामन टेकाम यांनी प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या जीवनचरित्र वर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वामन टेकाम यांनी केले यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *