१०५ व्या वाढदिवसानिमित्त धोंडू पाटील मोटघरे यांचा सरपंच वाढई यांनी केला सत्कार.

By : Moahn Bharti 

१०५ व्या वाढदिवसानिमित्त धोंडू पाटील मोटघरे यांचा सरपंच वाढई यांनी केला सत्कार.

राजुरा  :– दिनांक 14 सप्टेंबर 2021 ला निंबाळा येथील जेष्ठ नागरिक धोंडू पाटील मोटघरे यांच्या 105 व्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत कळमनाचे सरपंच तथा काँग्रेसचे ओबीसी विभाग ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. आणि त्यांच्या सुदृढ दिर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मोटघरे परिवाराने जिवंतपणी वडिलांचा वाढदिवस उत्साहात साजरा करून त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत आनंदी ठेवण्याचा व त्यांची सेवा करण्याचा संकल्प केला. त्यांच्या संकल्प व सेवेबद्दल गावातील समस्त नागरिकांनी त्यांचा हा आदर्श घ्यावा आणि जिवंतपणी आई-वडिलांची सेवा करावी, माणुसकीचे दर्शन घडवावे असे आवाहन सरपंच नंदकिशोर वाढई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
या प्रसंगी तंटामुक्ती समिती अध्यक्ष महादेव पाटील ताजने, मधुकर पाटील मोटघरे, भिवसन पाटील मोटघरे, जनार्दन पाटील मोटघरे, महादेव पाटील मेश्राम, ग्रा प सदस्य दीपक झाडे, अमोल उरकुडे, मधुकर पेंडोर, भास्कर पिंपळकर यासह समस्त गावकरी मित्र परिवार उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *