

शुक्रवारी चंद्रपूरचे वैभव बघण्याचा योग जुळून आला.पाच वर्षपासून या अनोख्या दुनियेबद्दल ऐकून होतो.आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या आजपर्यंत च्या विकासकामांना बघितलं आणि अनुभवलं सुध्या, पण मी शुक्रवारी जेथे भेट दिली ते ठिकाण बघून भाऊंनी आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वोत्तम ठेवा म्हणून या वैभवशाली कामाला महत्त्व का दिले याची साक्ष पटली. मी बोलतोय ते ठिकाण म्हणजे चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील सैनिक स्कूल. राज्यातील दुसरी शासकीय सैनिकी स्कूल म्हणजे अप्रतिम. प्रवेश करताच भव्य प्रवेशद्वार स्वागत करते आणि पुढे किती प्रचंड परिसर आपल्या डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठी सज्ज होते,हे बघणं खरच आल्हाददायक आहे.संपूर्ण परिसर म्हणजे आपण जगातल्या कुठल्यातरी देशातील रम्य ठिकाणी आहोत याची अनुभूती देते.रस्ते,रस्त्यांच्या बाजूला वैभवशाली इमारती,शूर सैनिकांचे पोट्रेट वजा पुतळे, म्युझियम, प्रशासकीय इमारती, शाळेची इमारत, वसतिगृह, स्टेडियम, इनडोअर स्टेडियम, कर्मचारी निवासस्थाने आणि प्रसन्न वातावरण. हिरव्यागार झाडांचे आच्छादन. सारेच लाजवाब. वर्णनासाठी शब्द थिटे पडावेत असे चित्र.
एक वेगळीच अनुभूती काल आली आणि मन प्रसन्न झाले.
सुधीरभाऊंचे शतशः आभार….
आम्ही एका आप्तेष्टांना भेटण्यासाठी गेलो.त्यांची भेट घेऊन परत निघण्याची घाई होती,पण या अनोख्या दुनियेतून आम्हा दोघांचा पाय निघत नव्हते. यावरून सैनिकी स्कूल कशी असेल याची आपण कल्पना करावी.