गडचांदूर येथे ऑनलाइन तान्हा पोळ्याचे पारितोषिक वितरण सपन्न

By : Mohan Bharti

गडचांदूर :  कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेले व सीमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गड़चांदुर येथे दरवर्षी तान्हा पोळा उसव मोठ्या जल्होशात साजरा केला जातो. मात्र मागीलवर्षी पासून राज्यात कोरोनाचे संकट असल्याने गड़चांदुर येथे तान्हा पोळा उत्सव समिति तर्फे ऑनलाइन तान्हा पोळा चे आयोजन करण्यात आले याला शहरातील बालगोपाळाचा उत्तम प्रतिसाद मिळाला . या स्पर्धेत युग सचिन झाड़े याने तान्हा पोळा स्पर्धेत मथुरातील श्रीकृष्ण नगरी ची प्रतिकृति मांडली व प्रथम क्रमांक पटकवला, द्वितीय क्रमांक देवांश एकरे. ने पटकीवला प्रथम व द्वितीय क्रमांक ईश्वर चिठ्ठी टाकून निवडला. तृतीय क्रमांक सुहानी निवलकर, चतुर्थ ,चैतन्य ठाकरे,पाचवा हेमन्त परसुटकर.सहावा देवेश टोंगे, सातवा,चिन्मय गोरे,आठवा चिन्मय चिव्हाणे,नववा अन्वया कोल्हे,दहावा स्वरा राजूरकर, पारितोषिकाचे मनकारी ठरले या कार्यक्र।मात कोविड योद्धा म्हणून,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील अन्सारी,नगर परिषदेचे प्रमोद वाघमारे.,ग्रामीण रुग्णालयाचे बबलू राठोड़. यांचा शाल व श्रीफळ देऊन पोळा समिति तर्फे सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रथम नागरिक नगराध्यक्षा सविता टेकाम.होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका मीनाक्षी एकरे. व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष हंसराज चौधरी.माजी न, प,उपाध्यक्ष सचिन भोयर.,सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकेर.जेष्ठ पत्रकार प्रा.अशोक डोईफोड़े,.डॉ शरद बेलोरकर. आनंदराव .एकरे.,पवन राजुरकर,.विक्की उरकूडे ,उध्दव पूरी. प्रवीण झाड़े.रोहन काकड़े उपस्थित,सर्व विजेत्या,तसेच सर्व सहभागी बालगोपालाना
पारितोषिके उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली , संचालन मयुर एकरे व पवन राजूरकर यांनी केले तर आभार उद्धव पुरी यांनी मानले,याप्रसंगी बालगोपाल पालकसोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पोळा उत्सव समितीचे मनोज भोजेकर, पवन राजूरकर, रोहन काकडे,मयूर एकरे यांचा अतिथीच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *