

लोकदर्शन 👉 मोहन भारती
![]()
गडचांदूर,,,(ता,प्र,)
आदिवासी,नक्षलग्रस्त तसेच अतिदुर्गम भागात शिक्षणाचे पवित्र कार्य करत असताना शिक्षकांना येत असणाऱ्या अनंत अडचणी शासनासमोर पोहोचवून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी केवळ याच प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनेची नितांत आवश्यकता होती या सर्व बाबींचा विचार करून विशेष म्हणजे नंदुरबार,गडचिरोली,चंद्रपूर,पालघर सारख्या आदिवासी,नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात सेवा देण्यासाठी ईतर जिल्ह्यातून आलेल्या तरुण शिक्षकांनी एकत्र येत दुर्गम क्षेत्र शिक्षक महासंघ या संघटनेची स्थापना केली तसेच दिनांक 16 डिसेंबर ला ऑनलाइन सभेद्वारे संघटनेची राज्य कार्यकारिणी सोबतच गडचिरोली, नंदुरबार,चंद्रपुर,पालघर या जिल्ह्यांच्या जिल्हा कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आल्या. यासाठी दिनांक 16 डिसेंबर रोजी श्री जयंत आमटे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यभरातून शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन मीटिंग घेण्यात आली या मीटिंगमध्ये या लढ्याचे आद्यप्रवर्तक व संस्थापक जयंत आमटे यांनी संघटनेच्या राज्यभरातील सर्व शिक्षकांशी चर्चा करून सर्वानुमते या निवडी जाहीर करण्यात आल्या.
संघटनेची राज्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:आहेत
अमोल जाधव- राज्याध्यक्ष,
तुकाराम आलट- राज्य सचिव,
राम पवार -कार्याध्यक्ष,
कल्पना ढोले- महिला आघाडीप्रमुख,
*विष्णू बडे- राज्य संघटक,*
निळकंठ शिंदे-सहसचिव,
*मुबारक पटेल- राज्य समन्वयक,*
अशोक भोसले- कोषाध्यक्ष,
कृष्णा तांबे -राज्य प्रसिद्धीप्रमुख,
गणेश महाजन-राज्य संपर्कप्रमुख
प्रणित धारगावे- नागपूर विभाग प्रमुख,
सतीश खाटेकर-नाशिक विभाग प्रमुख,
नारायण नागरे-अमरावती विभाग प्रमुख,
*दुर्गम क्षेत्र शिक्षक महासंघ चंद्रपुर जिल्हा कार्यकारिणी*
गजानन तिडके- जिल्हाध्यक्ष,
दया पवार- जिल्हा सचिव,
रंजना शहापुरे-महिला आघाडी
अमोल बदने-जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,
निल खरबे- कार्याध्यक्ष
काकासाहेब नागरे- मुख्य संघटक,
दीपक भोपळे- कोषाध्यक्ष
ज्ञानेश्वर बुधवंत- उपाध्यक्ष,
महेश गोरे-सहसचिव,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
” आदिवासी नक्षलग्रस्त तसेच अतिदुर्गम भागात काम करत असताना शिक्षकांना अनंत प्रकारच्या अडचणी येतात विशेषत 10-15 वर्ष अत्यंत दुर्गम भागात सेवा करूनही या क्षेत्रातील लोकांच्या स्व जिल्ह्यात आंतरजिल्हा बदल्या होत नाहीत तसेच तसेच अशा दुर्गम भागांमध्ये कार्य करत असताना जिल्हा अंतर्गत बदल्या मध्ये देखील अनेक प्रकारच्या अडचणी आहेत या सर्व प्रकारच्या अडचणी सोडविण्यास संघटना कटिबद्ध असेल.”
जयंत आमटे
दुर्गम क्षेत्र शिक्षक लढ्याचे आद्य प्रेरक व संस्थापक
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
” आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी चांगले गुणवान कर्मचारी मिळावेत यासाठी 11 जुलै 2000 शासन निर्णयानुसार 3 वर्ष चांगल्या प्रकारे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या जिल्ह्यात सोईप्रमाणे नेमणुका देण्याची तरतूद असून देखील याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत जी बाब संघटना शासनाच्या निदर्शनास आणून देऊन याबाबत न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असेल.”
विष्णू बडे (राज्य संघटक)
तथा मुबारक पटेल (राज्य समन्वयक)
राज्याध्यक्ष दुर्गम क्षेत्र शिक्षक महासंघ
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,