त्या….जमीन विक्री व खोट्या टॅक्स पावत्यांचे प्रकरण पेटतेय.!!

By : Shivaji Selokar

न.प.उपाध्यक्ष जोगी विरोधात जोगी नगरवासीने दिले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.!!

गडचांदूर:- कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे व औद्योगिक शहर गडचांदूर येथील व्हाईट कॉलर मंडळींनी आदिवासींच्या शेत जमीनी खरेदी करून लाखोंच्या दरात प्लॉट पाडून विक्री केल्या.व अमाप संपत्ती गोळा केली.याच पार्श्वभूमीवर येथील नगरपरिषदेत पुर्वी नगरसेवक,सभापती व आताचे उपाध्यक्ष शरद जोगी हे सुद्धा अशाचप्रकारे शेती खरेदी करून प्लॉट पाडून विकतात.याच पार्श्वभूमीवर सर्व काही व्यवस्थीत सुरू असतानाच येथील जोगी नगर प्रभाग क्रमांक २ चे रहिवासी यांनी सध्या उपाध्यक्ष जोगी यांनी फसवणूक केल्याचे आरोप करत नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी यांना ८ सप्टेंबर रोजी निवेदन देऊन उपाध्यक्ष जोगी विरोधात योग्यती कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
विनोद चौधरी व इतर जोगी नगरातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात सविस्तर असे की,गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष शरद जोगी यांनी पाच वर्षापुर्वी येथील मेश्राम नगराला लागून जोगी नगर या नावाने शेत स.न.१६/१,१६/२,१६/३ या शेतात प्लॉट टाकले व याला जोगी नगर असे नाव दिले. घेणाऱ्यांना सदर नगरातील प्लॉटचे दर परवडत असल्याने अनेकांनी खरेदी केले.त्यावेळी जोगी म्हणाले होते की,मी स्वतः नगरसेवक आहे आणि येथील रोड, नाली,वीजेचे काम येत्या काही दिवसात करून देतो.एवढेच नाही तर नगरपरिषदेत तुमच्या नावाची नोंद घेऊन घरकुलाचा लाभ सुद्धा मिळवून देतो.मात्र आजपर्यंत यापैकी काहीच घडले नाही.स्वत:चे घर असावे म्हणून लोकांनी यांच्याकडून वेगवेगळ्या किंमतीत प्लॉट खरेदी केले.हा व्यवहार फक्त एका शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवर झाला.असे असताना स्वतःच्या मालकीचे प्लॉट विकत असल्याचे सांगत त्यांनी विनोद मडावी,लिलाबाई मडावी, कवलाबाई सोयाम या आदिवासी बांधवांच्या सहींचे स्टँप यांना दिले.तेव्हा कळले की ही जागा त्यांची नसून आदिवासींची आहे.मात्र ही मंडळी मोलमजुरी करणारी व गरीब असल्याने आपल्या मोलमजुरीचे व उनवरीची रक्कम दिल्याने जोगी पुढे यांचा नाईलाज झाला.एखाद्याने म्हटले तर तुला काय अडचण आहे,बाकी कोणी काहीच बोलत नाही असे जोगी यांना म्हणायचे.काही दिवसांनी त्यांनी दिलेल्या जागेवर या प्लॉट धारकांनी झोपड्या बांधून राहायला सुरूवात केली.परंतू आश्वासन दिल्याप्रमाणे येथे काहीच सोईसुविधा पुरविण्यात आलेली नाही.तेव्हा विकास सोडा परन्तु आम्हचे नगर परिषद ला नोंदी करून द्या म्हणून नगरातील वासींनी जोगी कडे विनंती केली. असता नगरपरिषदेत प्लॉटांच्या नोंदीसाठी प्रत्येकी पाच हजाराचा खर्च येतील असे सांगण्यात आले.मात्र फेरफार होणार या आशेपोटी मागणीनुसार काहींनी रक्कम शरद जोगी यांना देण्यात आली.तेव्हा काही दिवसातच उपाध्यक्ष जोगी यांनी कमी रक्कमेची नगरपरिषदेचा शिक्का व सही असलेली टॅक्स पावती यांना आणून दिली अशी माहिती देण्यात आली आहे.
मात्र जेव्हा यातील काही प्लॉट धारक चालू वर्षाचा टॅक्स भरायला न.प.ला गेले असता “तुमच्या नावाची नोंद नाही,तुम्हाला टॅक्स पावती कशी काय द्यायची” असे नगरपरिषद कर्मचार्‍यांनी यांना सांगितले. तेव्हा दिलेल्या पावत्या खोट्या असल्याची बाब समोर आली.आम्ही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.हक्काचे छत्र असावे म्हणून आम्ही आपल्या आयुष्याच्या काबाडकष्टाची कमाईने प्लॉट घेतला.परंतू यांनी आमची अशी फसवणूक केली.सर्व सोईसुविधा देतो म्हणून खोटे आश्वासन देणारे तसेच आमच्या नावानी नगरपरिषदेला नोंद करून देतो म्हणून जास्तीची रक्कम घेऊन कमी रक्कमेची खोटी टॅक्स पावती देणारे,स्वतःचे प्लॉट म्हणून आदिवासींची जमीन विक्री करून आमची फसवणूक करणारे नगरपरिषद उपाध्यक्ष शरद जोगी यांच्या विरोधात योग्यती कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी वजा विनंती जोगी नगरातील या त्रस्त प्लॉट धारकांनी निवेदनाद्वारे केली आहे.आता मात्र मुख्याधिकारी यांना कितपत न्याय मिळवून देतात ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जिल्हाधिकारी चंद्रपूर,जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका विभाग जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर,नगराध्यक्षा न.प.गडचांदूर,न.प.विरोधी पक्ष नगरसेवक रामसेवक मोरे,नगरसेवक अरविंद डोहे तसेच नगरसेविका सौ.जयश्री ताकसांडे यांनाही निवेदन देण्यात आल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *