Home
Home गडचांदूर / कोरपणा “प्रधानमंत्री किसान समृद्धि केंद्र” शुभारंभ कार्यक्रमाचा शेतकरी बांधवांनी घेतला थेट प्रक्षेपणाचा लाभ

“प्रधानमंत्री किसान समृद्धि केंद्र” शुभारंभ कार्यक्रमाचा शेतकरी बांधवांनी घेतला थेट प्रक्षेपणाचा लाभ

by : Satish Musle

गडचांदूर :

देशाच्या आर्थिक विकासात कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे.
देशातील शेतकरी बांधव सुजलाम सुफलाम झाला पाहिजे ही मोदी सरकारची केंद्रीय नीती आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आज राजस्थान येथील सिकर येथून देशभरात “प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे” उदघाटन तथा “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” योजनेचा चौदावा हप्ता करोडो शेतकऱ्यांना हस्तांतरण करण्यात आला.सोबतच युरिया गोल्ड,सल्फर कोटेड युरियाचा शुभारंभ झाला.यावेळी भारतीय शेतकऱ्यांशी मा.पंतप्रधान साहेबांनी संवाद साधला.
परिसरातील शेतकरी बांधवांसह कवठाळा येथील चिंतामणी कृषि केंद्रामध्ये थेट प्रक्षेपण द्वारा हा कार्यक्रम पाहण्यात आला.सोबतच कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here