Home
Home गडचांदूर / कोरपणा नवरत्न स्पर्धेत बोरी नवेगावच्या दोन विद्यार्थिनी अव्वल

नवरत्न स्पर्धेत बोरी नवेगावच्या दोन विद्यार्थिनी अव्वल

शंकर तडस
गडचांदूर :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवाळपूर येथे 15 डिसेंबर रोजी आयोजित केंद्र स्तरीय नवरत्न स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी नवेगाव येथील दोन विद्यार्थिनी अव्वल ठरल्या आहेत. कथाकथन स्पर्धेत प्रेरणा अंगद मोरे प्रथम आली, तर स्मरणशक्ती स्पर्धेचा प्रथम क्रमांक राशी अशोक कुडमेथे हिने पटकवीला. राशी कुडमेथे हिने वादविवाद स्पर्धेतही दुसरा क्रमांक मिळवीत आपली चमक दाखवून दिली. या स्पर्धेत आवाळपूर केंद्रातील ११ शाळा सहभागी झाल्या होत्या. यावेळी नऊ प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातून केंद्रातील नऊ रत्ने निवडण्यात आली.
कोरपना तालुक्यातील आदिवासीबहुल बोरीनवेगाव या छोट्या खेड्यातील शाळेच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक विश्वपती गेडाम आणि शिक्षक एकनाथ पारटकर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here