दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी भाजपाची मोर्चेबांधणी

शंकर तडस
कोरपना :
कोरपना तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. त्याकरिता भाजपाच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून ज्येष्ठ नेते गावाला भेट देऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत  आहेत.
तालुक्यातील कोठोडा, बाखर्डी, निमनी, कुकुडसाथ, माथा, यरगव्हाण, जेवरा, कोळसी बु. येथे भाजपाचे चंद्रपूर लोकसभा विस्तारक खुशालभाऊ बोंडे  यांनी भेट दिली. यावेळी नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष,  सतीशभाऊ उपलंचिवार शहराध्यक्ष गडचांदुर, तसेच तालुक्यातील ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम भोंगळे, शिवाजीभाऊ सेलोकर, महादेवजी एकरे, नगरसेवक अरुणभाऊ डोहे,  नुतनकुमार जिवने  उपस्थित होते. भाजपा कोरपना तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवीत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी ही निवडणूक मोठ्या संख्येने जिंकावे असे आवाहन खुशाल भाऊ बोंडे यांनी यावेळी केले.
कुकुडसाथ ग्रामपंचायत निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेल्या कल्पनाताई ठाकरे यांचा भाजपाचा दुप्पटा टाकुन, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी  आयोजित बैठकीकरिता कवडु पाटील जरिले, रामदास कोहळे, यशवंत बदखल, शशीकांत आडकिने,  अशोक झाडे, निखिल भोंगळे, वैभव जमदाडे, कोडापे, सुर्यभान जिवतोडे,  पिंपळशेंडे, नैनेश आत्राम, बंडु गोंडे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी  सहकार्य केले. या बैठकीला कोरपना तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *