Home
Home Breaking News जसखार चे सुपुत्र शुभम जगदीश घरत याचे दैदिप्यमान यश इन्स्टिट्यूट ऑफ...

जसखार चे सुपुत्र शुभम जगदीश घरत याचे दैदिप्यमान यश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट पुणे येथून एम बी ए पदवी प्रथम श्रेणी ने उत्तीर्ण

 

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )
कै.जनार्दन शंभा घरत यांचे नातू, माजी सरपंच दामू शेठ यांचा पुतण्या तसेच जेएनपीटी कर्मचारी जगदिश घरत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वनिता घरत यांचा मुलगा शुभम याने पुणे येथील जे एस पी एम या इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथून डिग्री इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून बी एम सी टी पी एल या कंपनीत चांगल्या मोठ्या पदावर रुजू झाला. शिक्षणाची आवड असणाऱ्या शुभम ने अभ्यास सुरूच ठेवला. नोकरी करत असताना जो वेळ मिळेल त्या वेळेत मनापासून अभ्यास केला आणि हे दैदिप्यमान यश मिळवले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट खारघर या ख्यातनाम संस्थेतून एम बी ए ही पदवी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण होवून उरण तालुक्यातील जसखार गावाचे नाव उंचावले आहे. ह्या यशामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी यांनी त्याची भेट घेवून अभिनंदन केले आहे.विविध क्षेत्रातून शुभम घरत यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here