भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आता जसखारमध्ये तरुणाई निवडणूकीच्या रिंगणात. सर्वच राजकीय पक्ष विरोधात युवा संकल्प पॅनल

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 13 डिसेंबर 2022उरण तालुक्यातील जसखार ग्रामपंचायतींमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या एकत्रित येऊन लढणाऱ्या पॅनेल विरोधात अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली आहे.’ बस्स आता पुरे झाले ‘ असा निर्वाणीचा इशारा देत मागील काही सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचारी कारभार चव्हाट्यावर आणतानाच ” अब और भ्रष्टाचार करने ना नहीं दूॅगा” चा नारा देत युवक-युवतींनी भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांविरोधात दंड थोपटले आहेत.यासाठी निवडणूक कोणत्याही प्रकारे एक पैसाही खर्च न करता
पक्ष विरहित युवा संकल्प पॅनलच्या वतीने लोकनियुक्त सरपंचासह ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी सर्वच्या सर्व 11 जागांसाठी उमेदवार निश्चित करून निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला आहे.तशी शपथच श्री रत्नेश्वरी देवी ग्रामदेवते समक्ष घेतली आहे. एकही पैसा खर्च न करण्याचा निर्धार करून लढविण्यात येत असलेली जसखारची निवडणूक सर्वांसाठी आदर्श घालून देणारी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येऊ लागली आहे, तसतशी निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे.उरणमधील जसखार ग्रामपंचायतीची निवडणुक सर्वपक्षीयांविरोधात एकत्रित येऊन लढणाऱ्या तरुणाईमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.मागील काही वर्षांपासून सातत्याने सत्ता भोगणाऱ्या सर्वच सत्ताधारी पक्षांनी एकत्रित येऊन सत्ता भोगली.यातुन गावांचा विकास न करता स्वतःचाच अधिक विकास केला आहे.सत्तेचा फायदा उठवत हद्दीतील विविध कंपन्या,गोदामे,सीएफएस यावर अंकुश ठेऊन ठेकेदारीची कामे वाटून घेतली.

नोकऱ्या परप्रांतीयांना विकून टाकल्या.विकासकामांचा निधीही परस्पर लाटून टाकला.निवडणूका आल्या की प्रत्येक वेळी सर्वपक्षीयांमध्ये उमेदवारांच्या जागा वाटप केले जाते.त्यानंतर सत्तेत आल्यावर मात्र आपल्याच तुंबड्या भरण्यात आघाडी वर राहिले.त्यांना ना तुंबलेल्या नाल्यांमुळे पावसाळ्यात घरात पाणी शिरलेले दिसले.ना उड्डाणपूलासाठी सुरू असलेल्या पायलिंगच्या कामामुळे रत्नेश्वरी देवीच्या मंदिराला गेलेले तडे दिसले.प्रकल्प आणि कंपन्यांकडून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यासाठी ग्रामपंचायतीच्या सत्तेचा मागील अनेक सत्ताधाऱ्यांनी सर्वाधिक वापर केला. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून सर्व पक्षीय सत्ताधाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या सत्तेचा वापर केला.

ग्रामपंचायतींच्या सत्तेचा सातत्याने होणारा दुरुपयोग आणि स्वार्थी , मतलबी नेते, पुढारी यांचा सुरू असलेला भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आता जसखारमधील तरुणाई निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे.एकही पैसा खर्च न करताही निवडणुका लढवल्याही जातात आणि जिंकणारी येऊ शकतात ही जिद्द, चिकाटी बाळगूनच जसखार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणात तरुणाई त्वेषाने उतरली आहे.मनी,मसल अशा दोन्हीच्या जोरावर निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सर्वपक्षीयांचा मुकाबला तरुणाई कसा करते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *