गोंदिया येथील नाट्यगृहाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देणार* *सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय* *झाडीपट्टी व हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

मुंबई : गोंदिया येथे सांस्कृतिक विभागाकडून प्रस्तावित व नगर परिषदेकडून बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत नाट्यगृहाला पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात यावे आणि येत्या 15 ऑगस्टला त्याचे लोकार्पण व्हावे यासाठी युद्ध स्तरावर काम करा असे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.

या संदर्भात सह्याद्री अतिथी गृह येथे सोमवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार गोपालदास अग्रवाल, गोंदिया नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणकुमार चव्हाण, सांस्कृतिक विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

“झाडीपट्टी आणि हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून गोंदिया येथे अद्ययावत आणि सुसज्ज नाट्यगृह व्हावे आणि ते कलावंतांना परवडेल अश्या दरात उपलब्ध करुन द्यावे असेही निर्देश ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. या सभागृहासाठी सौर ऊर्जेचा अधिक वापर व्हावा अशा सूचना त्यांनी दिल्या.

सदर नाट्यगृह बांधण्यासाठी वाढीव अंदाजित खर्च याबाबत बैठकीत चर्चा झाली आणि 23.53 कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव नव्याने सादर करण्यात आला. या प्रस्तावाला ना श्री सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ मान्यता देऊन 31 डिसेंबर पर्यंत सुधारित मान्यता प्रदान कऱण्याच्या सूचना उपसचिव यांना दिल्या. निधी शक्य तितक्या लवकर उपलब्ध करुन दिला जाईल असे सांगून नगर परिषदेने हे काम तातडीने करुन घ्यावे असे निर्देश दिले. या सोबतच या सभागृहाच्या इमारतीत असलेल्या 34 गळ्यांसाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही सांगितले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *