साई अभ्यासिका ठरणार विध्यार्थीना नवसंजीवनी. — आमदार सुभाष धोटे. ,,साई अभ्यासिकेचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते उद्घाटन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

 

राजुरा(ता.प्र) :– राजुरा शहरात साई अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी मोठा आर्थिक फटका सहन करून विध्यार्थी अभ्यास करायला जातात. परंतु आता मात्र तिथे जाण्याची आवश्यकता नाही. त्याच पार्श्वभूमीवर राजुरा शहरात प्रथमच अतिशय आगळीवेगळी व आकर्षक अशी सर्व सोयीसुविधा असलेली वातानुकूलित साई अभ्यासिकेचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राजुरा नगर परिषदेचे माजी नागराध्यक्ष अरुण धोटे, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, न. प. चे माजी नगरसेवक हरजीत सिंग संधू, जेष्ठ पत्रकार डॉ. उमाकांत धोटे आदींची प्रामुख्याने उपास्थिती होती. या अभ्यासिकेमध्ये वैयक्तिक व सामुहिक अभ्यासिका खोली, मागणीनुसार पुस्तक संग्रह उपलब्ध केल्या जाणार आहे , दर महिन्याला विविध मान्यवर-अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन, प्रसिद्ध वर्तमान पत्रे, मॅगझिन आदीसह शेकडो पुस्तकं यांचा संग्रह उपलब्ध राहील. तसेच फ्री Wi-Fi ची सुविधा उपलब्ध आहे. संपूर्ण अभ्यासिका ही अध्यायावत सोयी सुविधेने नटलेली वातानुकूलित अशा वातावरणात आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासिकेचे उद्घाटन प्रसंगी शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मोठयासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहनदास मेश्राम यांनी केले. अभ्यासिकेच्या संचालिका सौ. अर्चना प्रवीण शेंडे यावेळी उपस्थित होत्या त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. राहुल मारोतराव रोहणे, आय. एफ. एस. हे या अभ्यासीकेचे मार्गदर्शक राहणार आहेत. ते सुद्धा या प्रसंगी उपस्थित होते.

———————————————-
सुभाष धोटे
आमदार, राजुरा
साई अभ्यासिका ही विध्यार्थीना नवसंजीवनी ठरणार असून जिद्द, चिकाटी व अभ्यासातील सातत्याने विध्यार्थीना यश नक्कीच संपादन करता येईल. शिस्तीचे पालन करून अभ्यास करणे, परिस्थितीची जाणीव ठेवून या साई अभ्यासिकेच्या उपलब्ध सोयी सुविधांचा वापर करून राजुरा शहराचे नावलौकिक झाले पाहिजेत असा विश्वास सुभाष धोटे, आमदार
यांनी साई अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. या अभ्यासिकेचे मार्गदर्शक राहुल रोहणे,आय.एफ. एस. अधिकारी वनविभागात कार्यरत असून ते राजुरा येथील इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक स्कूलचे विद्यार्थी असल्याचा अभिमान आम्हाला आहे असेही त्यांनी मनोगतातून व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here