सरपंचांनी गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घ्यावा. — आमदार सुभाष धोटे. ♦️जिवती येथे सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा आ. धोटे यांच्या हस्ते सत्कार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

जिवती :– नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिवती तालुक्यातील एकूण २९ ग्रामपंचायती पैकी काँग्रेसचे १३ सरपंच, १६ उपसरपंच आणि अनेक ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेत. विजयी झालेल्या काँग्रेसच्या सर्व सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शाल, काँगेस पक्षांचे दुप्पटां आणि वृक्ष देऊन सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. धोटे म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासावरच देशाचा विकास आणि प्रगती अवलंबून असते त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे कर्तव्य असावे की त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन सर्वतोपरी झटावे. ते पुढे म्हणाले की जिवती तालुक्यात आपण सातत्याने विकासकामे करीत आहोत. १४ गावांचे भूमी अभिलेख विभागा मार्फत मोजणीचे कामे सुरू असून येथील नागरिकांनाही महसूल विभागाचे पट्टे मिळणार आहेत.
या प्रसंगी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगाध्यक्ष अरुण धोटे, माजी जि. प. सदस्य भीमराव मडावी, तालुकाध्यक्ष गणपत आडे, महिला तालुकाध्यक्ष नंदाताई मुसणे, जेष्ठ कार्यकर्ता माधव डोईफोडे, सेवा कलश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे, सुग्रीव गोतावळे, भोजू आत्राम, पांडू पवार, शब्बीर पठाण, अशफाक शेख, दत्ता तोगरे, डॉ श्रीमान शेडके, केसव भालेराव, शंकर चव्हाण, सिताराम मडावी, अध्यक्ष ओ बी सी विभाग विष्णू मुसणे, अब्बास भाई, रामकिसन गायककांबळे, देविदास राठोड, वामन पवार, बालाजी तोगरे, शेख वजिर, विजय राठोड, आशिष डसाने, बालाजी गोटमवाड, सुनील शेडकी, काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुग्रीव गोतावडे यांनी केले, संचालन सिताराम मडावी यांनी तर आभार प्रदर्शन नैना शिंदे यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *