प्रत्येक समाजाने सर्व धर्म समभावाने वागावे… माणुसकी हाच खरा धर्म.. *♦️ – सागर कलाने,युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ,यांचं प्रतिपादन..*

लोकदर्शन अमरावती 👉राजू कलाने

दि. १८/०४/२०२३ रोजी सायंकाळी ६:३० वाजता अमरावती ट्रान्सपोर्ट नगर तीपुसुलतान मार्केट मधील हॉटेल शालिमार येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन शालिमार हॉटेल संचालक शेख नवशाद व यसिर भारती व अब्दुल नईम यांनी केले.

या वेळी विशेष उपस्थिती म्हणून दरवर्षी प्रमाणे यंदाही २६ वा रोजा पाळणारे युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सागरभाऊ कलाने व राजेशकाका जोशी यांनी रोजा पाळून सर्व समाजासमोर एकतेचे उदाहरण प्रस्तुत केले. त्याबद्दल यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
सध्या रमजान महिन्यातील २६ व्या रोजा दिवस आहे. हा दिवस रमजान मधील अतिशय महत्वाचा रोजा दिवस असतो या दिवशी कुराणशरीफ अस्तित्वात आणलं होते म्हणून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे.
काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सागरभाऊ कलाने यांनी संबोधन की, सर्व धर्म समभाव असावे आज देशा मध्ये हिंदू , मुस्लिम सिख, इसाई, नवबौध्द मध्ये वैचारिक विषमता पाहायला मिळते परंतु सर्वांनी एकत्र येऊन देश मजबूत केला पाहिजे. सर्व धर्मा मध्ये माणसाने मानसाशी माणसासारखे वागावे अशी शिकवण धर्माची आहे. म्हणून माणसाने फारसे पशू सारखे वागू नये. कारण फारसे पशू यांना विचार करण्याची क्षमता नसते. माणसाला निसर्गाने विचार करण्याची शक्ती दिली म्हणून त्याने निसर्गावर विकासात्माक दृष्ट्या अस्तित्व निर्माण करण्याकरिता वैज्ञानिक दृष्ट्र्या मजबुती प्राप्त केली .त्यामुळे नैसर्गिक बदल झाले. आज रोजी जर माणसाने माणसाला माणसासारखी वागणूक दिली नाही तर देशा मध्ये अराजकता निर्माण होईल. या दृष्ट्रीने आमंत्रित झालो. एक नवा संदेश म्हणून प्रत्येक माणसाने मत भेद बाजूला ठेऊन हिंदू मुस्लिम भाईचारा ठेवून एकत्रित येऊन चांगुल पणेचा संदेश द्यावा कारण माणुसकी हाच खरा धर्म आहे.
वैचारिक लोक यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बोलावून मुस्लिम धर्मातील सन उत्सव साजरे केले जातात. तसेच मुस्लिम बांधव सुद्धा शिवजयंती उत्सवा भीम जयंती मध्ये सहभागी होतात. त्यामुळे हिंदू मुस्लिम एकता दिसून येते एकता अबाधित राहते.तसेच त्यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याचे हार्दिक शुभेच्छा दिल्यात.यावेळी हॉटेल शालिमार संचालक शेख नवशाद भाई , अम. काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष यासिरभाई भारती, अम.काँग्रेस जिल्हा संगठक अब्दुल नईमभाई, अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभवभाऊ देशमुख , मोहम्मद शोएब भाई , अनस भाई , दानिश भाई , सोनू भाई आदी उपस्थित होते..

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *