द्रोणागिरी मध्ये मनसेच्या कार्यालयाचे मनसेचे नेते शिरिष सावंत यांच्या हस्ते उद‌घाटन

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 19 उरण विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत असून अनके तरुणांचा कल या पक्षाकडे वाढताना दिसून येत आहे. मनसेने निवडणूकांची जोरदार तयारी सुरू केली असून मनसे पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार करण्याच्या अनुषंगाने व जनसंपर्क वाढविण्याच्या दृष्टीकोनातून बुधवार दि.19 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरिष सावंत यांचा दौरा उरण तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम सकाळी 11. वा. बोकडविरा गावात बोकडविरा ग्रामपंचायत तर्फे शिरिष सावंत यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर द्रोणागिरी शहराचे शहराध्यक्ष रितेश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद‌घाटन मनसेचे नेते शिरीष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी 12:30 वाजता महाजेनको बोकडविरा येथील वीज कामगार सेनेच्या युनिटच्या नामफलकाचे अनावरण शिरीष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

 

संदेश भाई ठाकूर रायगड जिल्हाध्यक्ष,सत्यवान भगत उरण तालुका अध्यक्ष,राकेश भोईर उपतालुका अध्यक्ष,राहुल पाटिल उलवा शहर अध्यक्ष,निर्दोष गोंधळी उप तालुका अध्यक्ष,अल्पेश कडू तालुका सचिव उरण, दिपक पाटिल उप तालुका अध्यक्ष, संदीप ठाकूर विभाग अध्यक्ष,रोनित म्हात्रे फंडे शाखा अध्यक्ष,निलेश ठाकूर विज कामगार सेना, संतोष विसवेकर राज्य चिटणीस विज कामगार सेना,समाधान गोंधळी, शैलेश पाटिल,भूषण पाटिल, दिपक कांबळी उप जिल्हा अध्यक्ष,रामदास पाटिल पनवेल तालुका अध्यक्ष,संजय तना जिल्हा संघटक रस्ते आस्थापना,धनंजय भोरे उरण शहर अध्यक्ष,दिनेश हळदनकर आदी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मनसेचे नेते शिरीष सावंत यांच्या दौऱ्यामुळे मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले होते. मनसेच्या उरण मधील दौऱ्या निमित्त आयोजित विविध कार्यक्रमाला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *