चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करण्यासाठी राजुऱ्यात आंदोलन. सर्व पक्षीय निषेध मार्चमध्ये महिला काँग्रेसचा आक्रमक सहभाग.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. या बेताल विधानाच्या विरोधात राजुरा येथे भाजप सोडून सर्व पक्ष, सर्व पुरोगामी, बहुजनवादी, सामाजिक संघटना, महिला काँग्रेस यांच्या वतीने संविधान चौक राजुरा येथे उपस्थित राहून निषेध आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन सर्व महापुरुषांचा जयघोष करुन संकल्पबद्ध होत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या पाटीलांचा निषेध करण्यात आला. पोलिस स्टेशन राजुरा येथे तक्रार नोंदविण्यात आली. शेवटी राजुराचे तहसिलदार हरीश गाडे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मंत्री चंद्रकांत पाटीलांवर सामाजिक एकता भंग करून समाजात, राज्यात, देशात तेढ निर्माण करीत असल्याबद्दल कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. संविधान चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा निषेध मोर्चा काढण्यात आला. महिला काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेऊन मंत्री पाटलांचा निषेध नोंदविला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात महिला काँग्रेस ने मोठय़ा प्रमाणात सहभाग नोंदविला. या प्रसंगी नंदकिशोर वाढई, अॅड चंद्रशेखर चांदेकर, अॅड. मारोती कुरवटकर, मंगेश गुरणुले, ईरशाद शेख, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या चांदेकर, पुनम गिरसावळे, ज्योती शेंडे, संगीता मोहुर्ले, इंदूताई निकोडे, उज्वला कातकर, सुमित्रा कुचनकर यासह सर्व पक्षीय, सर्व पुरोगामी, बहुजनवादी, सामाजिक संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *