डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत प्रशिक्षण

By : Shankar Tadas

कोरपना  : 
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुका कृषि अधिकारी, कोरपना यांचे मार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेचे प्रशिक्षण दिनांक 4 मे 2024 रोजी हनुमान मंदिर सभागृह,पिंपळगाव
येथे संपन्न झाले. प्रशिक्षणाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी, गोविंद ठाकूर यांचे हस्ते झाले. प्रशिक्षणास मंडळ कृषि अधिकारी, मिलिंद ढोणे, प्रगतशील शेतकरी प्रभाकर जोगी, कृषि पर्यवेक्षक उ.वी. कृ. अ. राजुरा, सरवरपाशा जामई,असिस्टंट प्रोजेक्ट कॉर्डिनेटर, सुभाष बोबडे, पियू मॅनेजर, सिद्धेश्वर जम्पलवार, क्षेत्र अधिकारी रमेश लोनबले अंबुजा फाउंडेशन, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल घागी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण धानोरकर, कृषि सहाय्यक देवानंद कुळमेथे उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना विशाल घागी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी योजनेच्या विविध बाबींची माहिती दिली आणि नैसर्गिक शेतीचे फायदे, योजनेत विविध टप्प्यामध्ये करावयाची कामे, माती नमूना घेणे, जिओ टॅगिंग करणे, कुटुंबासाठी विषमुक्त अन्नाचे उत्पादन तसेच उत्पादीत शेतमालाची शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून विक्रि व्यवस्थापण कसे करता येईल याची सविस्तर माहिती दिली. सुभाष बोबडे यांनी नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक असल्याचे व त्यासाठी विविध निविष्ठा निर्मिती पध्दतीचा वापर करुन घरच्याघरी कृषि निविष्ठा तयार करुन शेतीवरील खर्चात बचत करणे आणि जमिन तसेच मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शनात सांगितले. नैसर्गिक शेती करित असतांना बाहेरुन निविष्ठा खरेदीवर अवलंबून न राहता गांडूळखत, कम्पोस्ट खत, जिवामृत, वेस्ट डिकम्पोझरचा वापर या बाबत सिद्धेश्वर जम्पलवार यांनी सखोल मार्गदर्शन केले.
येत्या हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणाचा वापर करावा, बियाणे पेरणीपुर्वी त्याची उगवण क्षमता तपासणी व जैविक बिजप्रक्रियेबाबत प्रात्यक्षिक, कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत तालुका कृषि अधिकारी, गोविंद ठाकूर यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व किड नियंत्रणाकरिता दशपर्णी अर्क, लमित अर्क, निंबोळी अर्क, सप्त धान्यांकुर तसेच विविध संजीवके निर्मिती व त्यांचा पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार वापर याबाबत 10 ड्रम थेरीच्या माध्यमातून सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण धानोरकर यांनी माहिती दिली. बायो चारकोल निर्मिती व वापर याबाबत प्रात्यक्षिकाव्दारे कृषि पर्यवेक्षक, सरवरपाशा जामई यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पिंपळगाव येथिल गटातील महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते. प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शेती सहयोग फार्मर प्रोडूसर कंपनीच्या सर्व संचालकांनी व गावातील शेतकऱ्यांनी सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *