भा ज पा कोरपना च्या वतीने देवरावभाऊ भोंगळे यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर


भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने देवरावभाऊ भोंगळे यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सतीशभाऊ उपलंचीवार शहराध्यक्ष गडचांदूर प्रमुख पाहुणे श्री विशाल गज्जलवार जिल्हा सचिव,श्री पुरुषोत्तमजी भोंगळे तालुका उपाध्यक्ष,श्री अमोल आसेकर माजी नगरसेवक,श्री हरीश घोरे शहर महामंत्री,सौ विजयालक्ष्मी डोहे जिल्हा महिला आघाडी महामंत्री,श्री अरुण डोहे नगरसेवक,श्री शशिकांत अडकिने,आशिष ताजणे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,ओम पवार युवा मोर्चा उपाध्यक्ष, श्री दिनेश खडसे,श्री दिनेश राठोड,श्री जगदीश पिंपळकर, प्रमोद पायगण,सागर दुर्वे,डॉक्टर,नर्स आदी मान्यवर उपस्थित होते 121 रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहात रक्तदान केले श्री देवराव भाऊ भोंगळे भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर यांनी श्रीकृष्ण सभागृह कोरपना येथे प्रमुख्याने रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे आभार मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच आयोजकांचे आभार मानले कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी महिला आघाडी तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *