जिवती नगरपंचायत वर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा.

लोकदर्शन 👉प्रा.गजानन राऊत

जिवती नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदी कविताताई आडे तर उपाध्यक्ष पदी डॉ. श्री. अंकुश गोतावळे यांची निवड.
निवडणूक दिनांक 17 रोज गुरुवारला पार पडली या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविताताई आडे यांना 12 तर गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या लक्ष्मीताई जुमनाके यांना 5 मते पडली तर उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. अंकुश गोतावळे यांना 12 तर गोंडवाना गणतंत्र पार्टी यांचे श्री जमालुद्दिन शेख यांना 5 मते पडली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री शिंदे यांनी कार्य पार पडले तर सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.

प्रा. गजानन राऊत
9767584069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here