राजुरा विधानसभेत नगर पंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी, कोरपना आणि जिवती येथे आज पार पडलेल्या नगर पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्नाखाली काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले असून कोरपना येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी काँग्रेस, गोंडपिपरी येथे अध्यक्षपदी काँग्रेस व उपाध्यक्ष पदी शिवसेना आणि जिवती येथे अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी क्षेत्रात केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन केला याचे फलित नगर पंचायत निवडणूकीच्या माध्यमातून दिसून आले.
आज पार पडलेल्या नगर पंचायत निवडणूकीत कोरपना येथे अध्यक्षपदी काँग्रेसच्या नंदाताई विजयराव बावणे यांची १२ विरूद्ध ५ मतांनी तर उपाध्यक्षपदी इस्माईल शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गोंडपीपरी येथे अध्यक्षपदी काँग्रेसच्या सविता बबलू कुळमेथे ११ विरूद्ध ६ मताने तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सारिका कैलाश मडावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आणि जिवती येथे अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता गजानन आडे यांची १२ विरूद्ध ५ मतांनी तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे अंकुश गोतावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सर्व तिनही नगर पंचायतीच्या नवनिर्वाचीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांचे आमदार सुभाष धोटे, विजयराव बावणे, अरूण धोटे, अरूण निमजे, कैलाश राठोड, गणपत आडे, विठ्ठलराव थिपे, तुकाराम झाडे, संदीप करपे, देवेंद्र बट्टे, देविदास सातपुते, निलेश संगमवार, सुरज माडूरवार, हेमराज गरपल्लीवार, विनोद नागापुरे, श्यामभाऊ रणदिवे, उत्तमराव पेचे सुरेश मालेकर, शंभाजी कोवे, भाऊराव चव्हाण, भिमराव मडावी, सुग्रीव गोतावळे, सिताराम कोडापे, अश्फाक शेख, कंटु कोटनाके यासह महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *