संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी


लोकदर्शन 👉 मोहन भारती


कोरपना – नांदाफाटा, आवारपूर व बिबी येथील बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी नांदाफाटा येथे मिरवणूक काढण्यात आली. बंजारा समाजाच्या वतीने बांधकाम करण्यात आलेल्या बिबी रामनगर येथील मंदिरात सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी गोर सिकवाडी समितीचे नागपूर विभागाचे सहसंयोजक गोविंद पवार, महाराष्ट्राचे सहसंयोजक विनोद चव्हाण, नागपूरचे संयोजक विनायक राठोड, उमेश आडे, माधव पवार, सुदर्शन राठोड इत्यादी मंडळींनी समाजाला मार्गदर्शन केले. बिबी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी यावेळी बंजारा समाजबांधवांना मार्गदर्शन केले.
यावेळी बंजारा समाजातील सैन्यात दाखल झालेल्या ब्रह्मा चव्हाण यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. गोरसेना मंडळ नांदाफाटा, बिबी व आवारपूरचे पदाधिकारी नागेश रत्ने, काशिनाथ शेरे, विनोद राठोड, मनोहर चव्हाण, पंडित आडे, गोपीचंद आडे, शंकर रत्ने व इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सहकार्य केले. यावेळी बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *