इंजिनियर साहित्यिक प्रवीण उपलेंचवार यांची संपुर्ण विदर्भाचे प्रांतपाल या पदावर नेमणुक करण्यात आले हार्दिक अभिनंदन*

लोकदर्शन नागपूर प्रतिनिधी 👉स्नेहा उत्तम मडावी

नुकत्याच झालेल्या मराठी साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय समितीच्या झालेल्या सभेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉ जयप्रकाश घुमटकर यांच्या पुढाकाराने व सिद्धार्थ जी कुलकर्णी विदर्भ प्रदेश अध्यक्ष यांच्या शिफारसींने इंजिनियर व साहित्यिक प्रविण उपलेंचवार यांची संपूर्ण विदर्भाचे प्रांतपाल म्हणजे च विदर्भ प्रांतपाल या पदावर नेमणूक करण्यात आली. या पदभारामुळे श्री प्रविण उपलेंचवार हे संपूर्ण विदर्भातील मराठी साहित्य मंडळाचे विस्तार व संपूर्ण कामकाज बघतील .श्री प्रविण उपलेंचवार हे मुळात सिव्हिल इंजिनियर असून नामांकित बिल्डर व उद्योजक आहेत. त्यांनी आतापावेतो 300 बंगल्याचे व 50 दुकानाचे एक व 300 बंगल्याचे व 20 दुकानाचे असे दोन मोठे रहिवासी कॉलनी तयार करण्याचे व इतर विविध प्रकल्प त्यांच्या बिल्डर च्या व्यवसायात पूर्ण केले. ते ऑरगॅनीक किटक नाशक व खते उत्पादनाचे व विक्रीचे काम अनेक वर्षापासुन तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायात मागील अनेक वर्षांपासून असे सुमारे 35 वर्षांपासून व्यवसायात अग्रेसर आहेत. साहित्यिक क्षेत्रात त्यांनी आतापावेतो 150 विविध कविता लिखाण करून विविध कार्यक्रमात सादर केल्या आहेत. त्यांनी ‘ सुसाट ‘ ही मराठी कादंबरी लिहिली आहे. व ‘तरंग मेंदीचे ‘ या अल्बममध्ये 18 गीते लिहून त्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे.
प्रवीण उपलेंचवार यांच्या या साहित्यिक क्षेत्रातील पदभारासाठी साहित्यिक क्षेत्रातील अनेक नामवंत साहित्यिकांनी यात डॉ बळवंत भोयर , डॉ विशाखा कांबळे , प्रा.नरेंद्र मोहिते , डॉ रमणीक लेंगुरे, नागपूर संमेलनाध्यक्ष रेखा जगनाडे मोतेवार ,जिजा मानकर,नीता चिकारे , दीपक देशमुख , मनीष उपाध्ये , प्राचार्य हिरालाल मेश्राम , प्रा पूनम भुरे , आरती वाघमारे , अनिता मसराम , राजेश वाघ व इतर अशा नामवंत साहित्यिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *