महात्मा गांधी विद्यालयात डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी


लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे भारताचे पहिले कृषिमंत्री ,शिवाजी शिक्षण संस्था चे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिताताई चिताडे होत्या,प्रमुख पाहुणे म्हणून संस्था चे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की,एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे, जेष्ठ प्राध्यापक प्रफुल्ल माहुरे होते,
सर्वप्रथम डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, एच बी मस्की यांनी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जीवनकार्य वर प्रकाश टाकला,
कार्यक्रमात चे संचालन प्रा आरजू आगलावे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा चेतना कामडी यांनी केले, याप्रसंगी दिन विशेष समिती च्या प्रमुख प्रा नंदा भोयर,तथा इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *