गडचांदूर शहरात भरदिवसा चाकूहल्ला

By : Mohan Bharti

गडचांदूर :

गडचांदूर शहरात भर दुपारी चौकात चाकूहल्ल्याची धक्कादायक घटना घडली.  26 डिसेंबरला दिनेश महादेव काळे वय 36 वर्ष, रा. बिबी ता. कोरपना  आणि भास्कर नारायण कांबळे वय 46 वर्ष रा. गडचांदूर या दोघांत भांडण झाले.  दुपारी दोन  वाजताच्या सुमाराला महात्मा गांधी विद्यालयासमोर रोडवर झालेल्या या घटनेत आरोपी भास्कर कांबळे याने दिनेश काळे याला चाकूने जखमी केले.  पत्नीच्या कारणावरून भास्करने चाकू हल्ला करून त्याला जीवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे कळते. जखमी दिनेशला पोलिसांनी उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे भरती केले. जखमीची प्रकृती सध्या स्थिर असून पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे रेफर केले आहे. गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन गडचांदूर येथे कलम 307 भा. द. वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *