सरपंचानी राजकारण विरहित गावाचा विकास करा* *खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते नवनियुक्त सरपंच सदस्यांचा सत्कार*

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

चंद्रपूर : आपण ज्या गावात जन्मलो त्या गावासाठी काही तरी भव्यदिव्य करावे, गावाचा विकास झाला तर राज्याचा अन् देशाचा विकास होईल. गावाचा विकास करून गाव स्वयंपूर्ण बनवावे. गावात विकास योजना राबवून या विकासाच्या योजना सर्वसामान्य पोहोचवून लोकांचे जीवनमान उंचवणे आणि आपले गाव हेच आपले कुटुंब समजून विकास कामांचा धडाका लावावा तसेच सरपंचानी राजकारण विरहित गावाचा विकास करा असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

आज वरोरा येथील खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालय यथे मूल तालुक्यातील ग्रामपंचायत बाबराळा, ग्रामपंचायत दुगाळा, ग्रामपंचायत बोंडाला खुर्द, तसेच पोंभूर्णा तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डा बोरकर, बल्लारपूर तालुक्यातील इटोली, काटवली बामणी, कवडजई, बामणी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांच्या सत्कार खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

पोंभुर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर येथील सरपंच रोहिणी नैताम, सदस्य राहुल कुंभरे, लसन वैरागडे, कल्पना शेडमाके, वैशाली कुंभरे, बेबीनंदा वाघाडे, अरविला सोपनकर, मूल तालुक्यातील दुगाळा येथील सरपंच प्रीती नरेश भांडेकर, सदस्य दिलीप भय्याजी सातपुते, सदस्य लता सातपुते, ग्रामपंचायत बाबराळा येथील सरपंच धीरज गोहणे, सदस्य धामदेव कोरडे, आशिना नाहगमकर, लता निमगडे तसेच बोडाळा खुर्द, जालीन बोगरे, रंजू नखाते, रोशन बागरे, बल्लारपूर तालुक्यातील इटोली येथील सरपंच तुलसीदास पिपरे, सदस्य नरेश बुरांडे, सुर्यकांत दयालकर, नागेश दुधबाडे, योगिता आमबदरे, आरती वरखडे, संगीता बोबाटे, कावटली बामणी येथील सरपंच रमेश ढुमणे, सदस्य कवडू वाघाडे, अरविंद गउकर, रसिका कोडापे , कवडजई येथील सदस्य रुपेश जुआरे, पुरुषोत्तम सिडाम, सविता पेंदोर, जिजाबाई देवाळकर तसेच बामणी येथील संजय गोधली, विजया मडावी येथील ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती.

यावेळी काँग्रेस जेष्ठ नेते घनश्याम मुलचंदानी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर, काँग्रेस पोंभुर्णा तालुकाध्यक्ष रवी मरपल्लीवार, काँग्रेस बल्लारपूर तालुकाध्यक्ष गोविंदा उपरे, आशिष अहिरकर, अंशू मोरे, राकेश नैताम, गुनेश सातपुते, बाळू भांडेकर नरेश भांडेकर गोविंदा रोहणकर यांची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *