स्व. हरिभाऊ मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त पुतळ्याचे अनावरण ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *भव्य मोफत आरोग्य शिबिरात 900 रुग्णांना दिली मोफत सेवा….*

,,,,,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन 👉 प्रा अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

गडचांदूर येथील अर्थ क्लीनिक चे संचालक डॉ. कुलभूषण हरिभाऊ मोरे यांच्या घरी ,जेष्ठ समाजसेवक,माजी सभापती नगर परिषद, गडचांदुर तथा उपवनसंरक्षक अधिकारी तसेच अर्थ फाउंडेशन चे संचालक स्व. हरिभाऊ मा. मोरे साहेब यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्य 18 डिसेंबर ला अर्थ फाऊंडेशन व्दारा भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी स्व. हरिभाऊ .मोरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले , कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. रामभाऊ गुंडीले (मा. आमदार नांदेड तथा मा. चेअरमन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, मुंबई अध्यक्ष भूमी हक्क परिषद म.रा.) यांच्या शुभ हस्ते सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रदीप खेकडे होते, प्रास्ताविक डॉ. कुलभूषण मोरे यांनी केले, सूत्रसंचालन राहुल गायकांबळे यांनी केले, प्रमुख अतिथी प्रा डॉ हेमचंद्र दूधगवळी,नगरसेवक रामसेवक मोरे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय गाठे , विट्ठल मुसळे ,डॉ कपिल गेडाम , डॉ श्वेता गेडाम , डॉ प्रदीप मंडल , डॉ समृधि वासनिक , डॉ नंदिनी मोरे ,डॉ आरती पानघाटे , डॉ के आर भोयर , मा. नरेंद्र गायकवाड शालेय पोषण अधिकारी अमरावती , मा. श्री. सुग्रीव गोतावळे ( जिवती ) ,मा. श्री. सुभाषराव निकाळजे (गृहरक्षक दल कमांडर, बुलढाणा) , अंकुश काकडे आशीष नामवाड ,होते, आयोजन कमिटी चे समाधान निकाळजे , मनीषा मोरे , गणेश ढगे , जगदीश मोरे ,नागोसे , सोमेश्वर , आडे, अक्षय , तिलक पाटिल , अंकिता गोंडे दीपाली चौथाले, यानी कार्यक्रमाच्या सफलतेसाठी परिश्रम घेतले ,याप्रसंगी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते , शिबिरामध्ये एकूण 900 रुग्णांनी लाभ घेतला, रुग्णांनी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, , या भव्य आरोग्य शिबिरामधे हृदयरोगासंबंधीत आजार, ई.सी.जी., बी.पी. शुगर तपासणी व उपचार, थॉयराईड आजारावर उपचार, किडणी चे आजार ,मुत्रविकार संबंधीत उपचार, झोपेचे विकार, लकवा, नैराश्य, शरिरात मुंग्या येणे, दारू व्यसन मुक्ती, पचनक्रियेसंबंधित उपचार, अॅसिडीटी, आम्लपित्त, पोटाचे विकार, मूतखडा, मूळव्याध, भगंदर, संधिवात, आमवात, सांध्यांचे दुखणे, सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया, त्वचाविकार व खाज, मासिक पाळी संबंधित आजार, गरोदर माताची तपासणी, स्त्रीयांचे आजार ,बालकांचे आजार, कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी, बालकांचे वजन न वाढणे, भूक न लागणे, सर्दी, खोकला, ताप, चिडचिडेपणा, अंगावर खाज येणे व बालकांच्या इतर सर्व आजारावर

मेंदू रोग तज्ञ डॉ. कपिल गेडाम

बालरोगतज्ज्ञ डॉ. समृध्दी वासननिक

स्त्री रोग तज्ञ डॉ. श्वेता गेडाम*

हृदय रोग व मधुमेह तज्ञ डॉ. प्रदिप मंडल
आयुर्वेद तज्ञ डॉ. कुलभुषण मोरे*

स्त्री रोग तज्ञ व होमिओपॅथी तज्ञ
डॉ. नंदिनी मोरे यांनी रुग्णांची तपासणी केली,

आरोग्य शिबिर आयोजक तथा अर्थ फाऊंडेशन चे संचालक डॉ. कुलभूषण मोरे यांच्या मार्गदरशनाखाली अर्थ टीम नी सर्व रूग्णांना त्यांच्या आजारावर नियंत्रण कसे ठेवायचे आपले निरोगी जीवन कसे जगायचे व आपल्या दैंनदिन जीवनातील दिनचर्या कशी असावी याबदल सर्व रूग्णांना मार्गदर्शन केले व सर्व आजारांवर तपासनी करून उपचार केले,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *