आ. सुभाष धोटेंच्या हस्ते राजुरा येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :–
सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चंद्रपूर, स्थानिक विकास निधी अंतर्गत नगरपरिषद राजुरा येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये राजुरा शहरातील नगरपरिषद जवळील भोई समाजास सभागृहाला संरक्षण भिंत बांधकाम करणे १० लक्ष रुपये, रमाबाई नगर वार्ड येथे बुद्धविहारा जवळ संरक्षण भिंत व शौचालय बांधकाम करणे १० लक्ष रुपये, सोनिया नगर वार्ड येथे सभागृह बांधकाम करणे १० लक्ष रुपये, इंदिरानगर वार्ड मधील सवारी बंगल्याजवळ सभागृह बांधकाम करणे १० लक्ष रुपये इत्यादी विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय अभियंता आकाश बाजारे, साईनाथ बतकमवार, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी नगरसेवक आनंद दासरी, प्रभाकर येरने, गजानन भटारकर, ॲड. चंद्रकांत चांदेकर, साबीर सय्यद, निरज मंडळ, रतन पचारे, सरवर पटेल, वहाब कुरेशी, इस्माईल कुरेशी, जमील अहेमद, जमील कुरेशी, शेख सुरू, कुरेशी सर, भारत रोहणे, रवी यवले, वसीम शेख यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *