अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर तर्फे जिल्हा परिषद शाळेत बालोत्सव कार्यक्रम साजरा

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,
अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन आवारपूर विद्यार्थांच्या शिक्षणाला नेहमी वाव देत असते हे लक्षात घेता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूरने, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सांगोळा येथे बालोत्सव कार्यक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमाला अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवापुरचे उपाध्यक्ष (मा. सं.) श्री. गौतम शर्मा, सी. एस. आर. प्रमुख श्री. सतीश मिश्रा व सी. एस. आर. टीम चे श्री. प्रतीक वानखेडे व श्री. सचिन गोवारदिपे तसेच सांगोडा गावाचे सरपंच सौ. संजनाताई बोंडे व उपसरपंच, सौ. ज्योतीताई धोटे व शालेय व्यवस्थापक अध्यक्ष श्री. अनील मोहितकर, मुख्याध्यापक, सौ. शेंडे मँडम, व पोलीस पाटील सौ. सुचिता पाचभाई, केंद्रप्रमुख मुसळे सर यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात एकूण एकूण ७२ मुलांनी सहभाग घेतला होता व त्यांना स्वसंरकक्षण साठी कराटे, नुत्य, चित्रकला, हस्तकला व विविध खेळ याचे प्रशिक्षण श्री. रत्नाकर भेंडे सर व त्यांच्या संचांनी दिले. या सोबतच विद्यार्थांच्या मध्यांन भोजनाची व्यवस्था अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर तर्फे करण्यात आली होती.

अल्ट्राटेक सिमेंट आवारपूरचे उपाध्यक्ष (मा. सं.) श्री. गौतम शर्मा यांनी या कार्यक्रमाचे मनोसक्ष्य स्तुती करत या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात. सोबतच माजी सरपंच श्री. सचिन बोंडे आपल्या भाषणातून अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशनचे आभार मानले व असे कार्यक्रम नेहमी आपणाकडून राबविण्यात यावे अशी विनंती सुद्धा केलीत.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सी.एस.आर. टीम चे सदस्य श्री. संजय ठाकरे, श्री. देविदास मांदाळे यांनी पथक प्रयत्न केलेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *