शिवसेनेत इन कंमिंग सुरूच. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा करिष्मा. उरण विधानसभा मतदारसंघातील वावेघर येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 12 डिसेंबर 2022
सोमवार दिनाकं 12 डिसेंबर 2022 रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख ज्ञानेश्वर माळी यांच्या सहकार्याने उरण विधानसभा मतदारसंघातील पनवेल तालुक्यातील वावेघर येथील कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात (शिवसेनेत) प्रवेश केला. यामध्ये अक्षय राठोड राजेश धोत्रे, संजय धोत्रे, दिलीप शिंदे, रोहीत शिंदे, राकेश शिंदे, विकास राठोड यांनी आपल्या कुटूंबियांनसह शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सर्व कार्यकर्त्यांना भगवी शाल अर्पण करून शिवसेनेत स्वागत केले.पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला युवकांचा, जनतेचा पाठींबा वाढत चालला आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *