महात्मा गांधी विद्यालयात मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे 3 डिसेंबर ला सहशालेय उपक्रम फीट इंडिया अंतर्गत मुलींच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.5 किमी. च्या या स्पर्धेत 260 विद्यार्थिनीनी भाग घेतला. मुख्याध्यापीका सौ स्मिताताई चिताडे व प्रभारी सचिव धनंजय गोरे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरवात केली.सुरक्षित रित्या स्पर्धा पार पडली..पोलीस विभागने स्पर्धेचा मार्ग खुला ठेवण्या करीता मोलाची मदत केली.
या स्पर्धेत माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक अंजली सलगर ,द्वितीय दीप्ती चव्हाण,तृतीय अनुराधा हिरादेवे, प्रोत्साहन पुरस्कार श्रुतिका बल्लावार ला मिळाला ,प्राथमिक गटात प्रथम क्रमांक नंदिनी मुंढे,द्वितीय संस्कृती परसुटकर, तृतीय वांशिक जीवने, प्रोत्साहन पुरस्कार लीना वाडगुरे हिने मिळविला,
सर्व विजेत्या मुलींना पुरस्काराने गौरविण्यात आले,
बक्षीस वितरण प्रसंगी मुख्याध्यापिका सौ स्मिताताई चिताडे यांनी रनिंग चे व व्यायामाचे महत्व सांगितले,याप्रसंगी उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, क्रीडा शिक्षक बबन भोयर, संजय झाडे,व इतर शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते,
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *