युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी कुणाल कुडे तर राजुरा तालुका चिटणीसपदी प्रविण पेटकर


लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– युवावेनेचे विद्यमान तालुका चिटणीस (संघटक) कुणाल निळकंठ कुडे यांची युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी तर प्रविण रमेश पेटकर यांची राजुरा तालुका चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना नेते युवासेना प्रमुख मा. आदित्य ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्हा युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून यात विद्यमान तालुका चिटणीस (संघटक) भा कुणाल कुडे यांना बढती देऊन त्यांची युवा सेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली आहे तर विद्यमान उपतालुकाप्रभूम प्रविण पेटकर यांची बढती देऊन राजुरा तालुका चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राजुरा शहर प्रमुखपदी स्वप्नील मोहुर्ले तर उपशहर प्रमुखपदी श्रीनाथ बोल्कुवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्या नियुक्तीचे शिवसेना युवासेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य मा. निलेशदादा बेलखेडे, श्रीमती सरिता निळकंठ कुडे, सास्तीचे सरपंच रमेश पेटकर, जिवन बुटले, नरसिंग मादर, शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव चापले, वतन मादर यासह शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभिनंद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here